Frontline News Maharashtra

सई वाटेगावकर व युतीका पुजारी राष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेत चॅम्पियन्स यस ग्रुप ॲबॅकस चे घवघवीत यश

No comments :

 सई वाटेगावकर व युतीका पुजारी राष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेत चॅम्पियन्स यस ग्रुप ॲबॅकस चे घवघवीत यश.

--------------------------

जयसिंगपुर/प्रतिनिधी

-----------------------

 महाराष्ट्र ॲबॅकस असोसिएशनच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या खुल्या राष्ट्रीय स्तरावरील ॲबॅकस स्पर्धेत येस् ग्रुप ॲबॅकसने भरघोस यश मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. यामध्ये सई वाटेगावकर व युतीका पुजारी यांना चॅम्पियन्स ट्रॉफी मिळाली. तर  साद आतार,  कृष्णा सुपेकर, इशिता शिंदे, प्रज्ञेश घोरपडे, आरव कदम, सार्थ विरकायदे, आरव गुरसाळे, न्यानमुद्रा फरांदे, स्वरा शिंदे, स्वरा पांढरपोट्टे, चरित्रा पुजारी, मयुरेश शेटे, चिन्मय पवार, वैभव किर्दत या विद्यार्थ्यांनी पदके पटकावली. त्यांच्या यशामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्याला गौरव प्राप्त झाला आहे.

महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतील हजारो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

या स्पर्धेत यस् ग्रुप ॲबॅकस च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अनेक पदके व पुरस्कार पटकावले. त्यांच्या या कामगिरीबद्दल येस् ग्रुप ॲबॅकसला ‘बेस्ट सेंटर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सातारा येथील येस् ग्रुप ॲबॅकस समर्थ मंदिर, करंजे, दौलतनगर तसेच गणपती आळी, वाई शाखेचे विद्यार्थी या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते.  

या अभूतपूर्व यशामुळे येस् ग्रुप ॲबॅकसच्या विद्यार्थ्यांवर, शिक्षकांवर आणि संपूर्ण टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यांचा मोलाचा वाटा आहे, हे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांना प्रशिक्षिका प्रा.सना आतार व प्रा.शिफा आतार यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

येस् ग्रुप ॲबॅकस हे केवळ गणित शिकवण्यापुरते मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांचा मानसिक विकास, एकाग्रता, वेग आणि अचूकता वाढवण्यासाठी कार्यरत आहे. त्यांच्या यशाने अनेक नवोदित विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे.

No comments :

Post a Comment