Header Ads

कळेतील श्रीराम दूध संस्थेच्या सभेत ’गोकुळ’चा निधी इमारत डागडुजीसाठी; जुने सभासद पूर्ववत करण्यास मंजूरी.

 कळेतील श्रीराम दूध संस्थेच्या सभेत ’गोकुळ’चा निधी इमारत डागडुजीसाठी; जुने सभासद पूर्ववत करण्यास मंजूरी.




------------------------------

कळे प्रतिनिधी

साईश मोळे

------------------------------

कळे येथील श्रीराम दूध संस्थेच्या वार्षिक सभेत गोकुळ ठरावाचा निधी इमारत डागडुजीसाठी; जुने सभासद पूर्ववत करण्यास मंजूरी देण्याचे ठरले. सन २०२४-२५ चा अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रके, घट-वाढ पत्रक तसेच सन २०२५-२६ च्या अंदाजपत्रकास मंजूरी देण्यात आली. मागील सभेचे प्रोसिडिंग वाचनानंतर झालेल्या चर्चेत सभासदांनी विविध प्रश्न उपस्थित केले. आयत्यावेळी मांडलेल्या विषयांमध्ये ‘गोकुळ’ च्या ठरावातून मिळणारी रक्कम संस्थेच्या इमारतीच्या डागडुजीसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच काही वर्षांपूर्वी कमी करण्यात आलेल्या सभासदांना पुन्हा पूर्ववत करण्यास विश्वास नाईक यांनी मागणी केली. त्याला मंजूरी देण्यात आली. दूध उत्पादकांनीच सभेच्या कामकाजात सहभाग घ्यावा असे संस्थेच्या नोटीसमध्ये पूर्वघोषणा करण्यात आली होती. संपूर्ण सभेत उत्साही वातावरणात सर्व विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. यावेळी अध्यक्ष जयवंत पाटील, उपाध्यक्ष मालुबाई इंजुळकर, सचिव बाजीराव पाटील, कृष्णात कुरणे , वसंत चव्हाण, सचिन पाटील, मारुती देसाई, विश्वास नाईक, संजय इंजुळकर, संजय पाटील, सागर पाटील, गणेश नाईक यांच्यासह सर्व सदस्य, सभासद उपस्थित होते.

कोल्हापूर विभाग


No comments:

Powered by Blogger.