गहिनीनाथ समाचार रौप्यमहोत्सवी वर्षात शानदार प्रवेश व वर्धापन दिनानिमित्त स्नेह मेळावा संपन्न.
गहिनीनाथ समाचार रौप्यमहोत्सवी वर्षात शानदार प्रवेश व वर्धापन दिनानिमित्त स्नेह मेळावा संपन्न.
-----------------------------
सलीम शेख
-----------------------------
कागल : स्वर्गीय दिलीपरावजी सणगर यांच्या गहिनीनाथ समाचार रोप्य महोत्सवी वर्धापनदिन आणि सत्कार समारंभ नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. २०२५ वर्षात गहिनीनाथ समाचार रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले असून, या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे अनावरण आणि शुभारंभ करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री, हसनसो मुश्रीफ आणि माजी आमदार व चेअरमन, अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी कारखाना, संजय (बाबा) घाटगे, श्रीमंत मृगनयनाराजे घाटगे उपस्थित होते.
वर्धापनदिन अंकाचे अनावरण मान्यवरांच्या शुभहस्ते वर्धापनदिन विशेषांकाचे अनावरण करण्यात आले.
गहिनीनाथ शिष्यवृत्ती सराव परीक्षा घोषणा व पोस्टर अनावरण: स्व. दिलीपरावजी सणगर यांच्या स्मृतीदिनी ५ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मा. दिलीपरावजी सणगर एज्युकेशन अँड चॅरीटेबल ट्रस्ट व गहिनीनाथ प्रिंटर्स अँड पब्लिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने गहिनीनाथ शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजय बाबा घाटगे , श्रीमंत मृगनयनाराजे यांच्या हस्ते या परीक्षेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. कासोटे मॅडम शिक्षणाधिकारी पंचायत समिती कागल यांच्या मदतीने शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजन करण्यात आले.
रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या दिलीपरावजी सणगर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वेबसाईटचा शुभारंभ संजय (बाबा) घाटगे यांच्या हस्ते झाला. विशेष म्हणजे, ही पतसंस्था जिल्ह्यात सर्वप्रथम QR कोड प्रणाली वापरणारी आहे. पतसंस्थेच्या नवीनतम प्रिंटींग पासबुकचे वाटप शिवराय शिक्षण प्रसारक मंडळ, कागल यांच्या उपाध्यक्षा श्रीमंत मृगनयनाराजे मृ. घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात पत्रकार बांधवांचा विषेश सत्कार करण्यात आला.यावेळी जहांगीर नाईकवाडी,शामराव पाटील, शकील तासिलदार , सलीम शेख, विक्रांत कोरे, अमन सय्यद या सर्व सत्कारमूर्तींना एक वेगळा सत्कार करत उबदार घोंगडे व स्मृतिचिन्ह देण्यात आले. सत्कार म्हणून घोंगडे देण्याची ही विशेष पद्धत सर्व कार्यक्रमात चर्चेचा विषय ठरला. तसेच कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्यांनी पुष्पगुच्छना फाटा देत वही पुस्तके दिले. वह्या व पुस्तकांचे संकलन मोठ्या प्रमाणात झाले त्यामुळे या कार्यक्रमाची एक विशेष रंगत निर्माण झाले. यामध्ये दिवाळी अंक २०२४ मध्ये उत्कृष्ट लेखन करणारे अप्पासाहेब जकाते (यादव) आणि कीर्ती मुळीक यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. दिलीपराव सणगर आणि गहिनीनाथ यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. सम्राट दिलीपराव सणगर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मान्यवर पाहुण्यांचे स्वागतपर सत्कार करण्यात आले.
दलितमित्र एस. आर. बाईत (सर) यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर अमर दिलीपराव सणगर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमानंतर अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमात कागल तालुक्यातील वाचक, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक व भागातील नागरिक उपस्थित होते.
No comments :
Post a Comment