*पावनगडावर पोलीस अधिकाऱ्यांना बिबट्याचे दर्शन*
पावनगडावर पोलीस अधिकाऱ्यांना बिबट्याचे दर्शन.
*******************
सुदर्शन पाटील
बाजार भोगाव
********************
बुधवारपेठेतून पावनगडमार्ग पन्हाळागडाकडे जाणाऱ्या कच्चा रस्त्याचाकडेला अवध्या दहा फुटावर पन्हाळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय बोंबले यांना बिबट्याचे दिसला .पावनगडाच्या जंगलात मुक्तपणे विहार करताना पोलिस गाडी बघून जागेवर थांबलेल्या बिबट्याच्या दहा सेंकद बघत उभारलेला क्षण पोलिस अधिकाऱ्यांनी गाडीतून जाताना मोबाईलच्या कॅमेरात टिपला.पावनगड ते पन्हाळागड या परिसरात पेट्रोलिंगला गेल्यानंतर शुक्रवारी सांयकाळी ६.२० चा दरम्यान बिबटा दिसल्याची घटना घडली.काही वेळात बिबट्या तेथून निघून गेल्याचे त्यांनी सांगितले.पावनगड आणि पन्हाळागडाच्या जंगलात आणि मानवी वस्तीत बिबट्ये वारंवार दिसत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

No comments: