आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून कुरुंदवाड आगाराला ५ नवीन बसेस.
आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून कुरुंदवाड आगाराला ५ नवीन बसेस.
---------------------------------------
जयसिंगपूर प्रतिनिधी
नामदेव भोसले
---------------------------------------
कुरुंदवाड आगार, जयसिंगपूर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नातून ५ अत्याधुनिक बीएस-६ मानांकन प्राप्त नवीन बसेस दाखल झाल्या आहेत. नुकत्याच जयसिंगपूर बसस्थानक येथे आयोजित पूजन सोहळ्यात आमदार यड्रावकर यांच्या हस्ते या बसेस प्रवासी सेवेकरिता दाखल करण्यात आल्या.
या वेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले,
"कुरुंदवाड आगार व परिसरातील प्रवाशांच्या सतत वाढत्या गरजेनुसार अधिकाधिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे प्राधान्य आहे. यापूर्वी माझ्या प्रयत्नातून आगाराला १५ नवीन बसेस मिळाल्या होत्या. आता आणखी ५ बसेस दाखल झाल्यामुळे एकूण २० बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे."
त्यांनी पुढे सांगितले की, ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना एस.टी. सेवा ही मोठा दिलासा ठरते. त्यामुळे या सेवा सक्षम व सोयीस्कर व्हाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या नवीन बसेस आधुनिक तंत्रज्ञानयुक्त असून कमी प्रदूषण करणाऱ्या व अधिक इंधन कार्यक्षम आहेत. त्यामुळे प्रवास पर्यावरणपूरक तर होईलच, पण प्रवाशांना अधिक आरामदायी अनुभव देखील मिळणार आहे. या बसेस कुरुंदवाड आगारातून विविध मार्गांवर धावणार असून, तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
आमदार यड्रावकर यांनी या बसेस मिळवून देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विशेष आभार मानले.
या सोहळ्यात आगार प्रमुख नामदेव पतंगे, माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे, माजी नगरसेवक बजरंग खामकर, पराग पाटील, अर्जुन देशमुख, आप्पासो खामकर, दादा पाटील चिंचवडकर, रजनीकांत कांबळे, अमोल शिंदे, संभाजी कोळी, विनायक गायकवाड, विनायक खाडे, सचिन डोंगरे, सागर माने, बबन यादव, अशोक माळगे, सुरज भोसले, निवास वडर, प्रभाकर चौगुले, आनंदा खाडे, रमेश धंगेकर, इमरान शेख यांच्यासह आगार कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment