जयसिंगपूरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांचा प्रयत्न करणारे बाहेर गावातील मोजके विरोधक.
जयसिंगपूरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांचा प्रयत्न करणारे बाहेर गावातील मोजके विरोधक.
--------------------------------------
जयसिंगपूर प्रतिनिधी
नामदेव भोसले
--------------------------------------
जयसिंगपूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू आहेत. या चळवळीत विविध गावातील तरुण सहभागी होत आहेत. मात्र, जयसिंगपूर शहरातील सर्व समाज बांधवांनी पुतळा उभा राहावा अशी भूमिका घेतली आहे, पण सध्या जयसिंगपूरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे म्हणणारे बाहेर गावातून येणारे मोजकेच विरोधक आहेत त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय जयसिंगपूर शहरवासीय हाणून पाडतील, पुतळा उभारण्याचा निर्णय जयसिंगपूरकरांनीच घेतला आहे असा ठाम पवित्रा आमदार राजेंद्र यड्रावकर यांचे भाऊ संजय पाटील यड्रावकर यांनी घेतला आहे.
संजय यड्रावकर यांचे म्हणणे आहे की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरां विषयी आमच्या मनात सर्वोच्च श्रद्धा आहे. पुतळा उभा करणे हा आमच ध्यास आहे. मात्र जयसिंगपूर शहरातील प्रश्न जयसिंगपूरकरांनीच बसून सोडवावा. बाहेरच्या गावातील लोकांनी हस्तक्षेप केल्यास स्थानिक वातावरण बिघडण्याचा धोका आहे.”
त्यांनी स्पष्ट केले की, “आंबेडकर पुतळ्याचा सन्मान व पावित्र्य जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र बाहेरच्या गावातील लोक जयसिंगपूरात येऊन आंदोलन उभे करत असतील, तर त्याचा परिणाम शहरातील शांततेवर होऊ शकतो.
शहरातील स्थानिक नागरिकांनी मिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेकांचा विश्वास आहे की, संजय यड्रावकरांचा उद्देश दलित समाजाला विरोध करण्याचा नसून, शहरातील वातावरण शांत व लोकशाही मार्गाने तोडगा निघावा हाच आहे.
समाजातील व तालुक्याच्या गावागावातील घटकांनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत म्हटले आहे की, “डॉ. बाबासाहेबांचा विचार हा सर्वांसाठी आहेच; पण संघर्ष करताना स्थानिक प्रश्न स्थानिक लोकांनीच मार्गी लावले पाहिजेत. बाहेरून आंदोलन आणून शहरात तणाव निर्माण करण्यापेक्षा स्थानिक पातळीवर एकत्र येऊन प्रश्न सोडवणे योग्य आहे.”
जयसिंगपूरातील सद्यस्थिती पाहता, संजय यड्रावकरांची भूमिका ही समाजात शांतता आणि सुसंवाद टिकवण्यासाठीचा प्रयत्न असल्याचे त्यांच्या समर्थकांचे मत आहे.
Comments
Post a Comment