मालवाहतूक कंटेनर घसरला.
मालवाहतूक कंटेनर घसरला.
------------------------------
संस्कार कुंभार
------------------------------
कोल्हापूर : कोगनोळी फाट्यानजीक आज सकाळी एक मालवाहू कंटेनर रस्त्याच्या अपूर्ण दुभाजकामुळे खाली घसरला, हा कोगनोळी ऊन कोल्हापूरच्या दिशेने जात होता. परंतु सुदैवाने कोणतीही जीवित किंवा मोठी आर्थिक हानी झाली नाही. ही घटना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आणि त्यामुळे महामार्गावरील अपूर्ण कामांचा आणि टोल वसुलीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून खराब रस्त्यांमुळे टोल आकारू नये, असे कोर्टाने आदेश दिले आहेत. असे असतानाही महामार्गावर अनेक ठिकाणी रस्ता दुरुस्तीची कामे अपूर्ण आहेत आणि दुभाजकही पूर्ण झालेले नाहीत. असे असूनही टोल नाक्यांवर पूर्ण दरात टोल आकारला जात आहे, ज्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
या अपघातानंतर, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अपूर्ण कामांमुळे होणारे अपघात आणि त्यामुळे होणारी आर्थिक तसेच जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हा प्रश्न केवळ एका टोलनाक्यापुरता मर्यादित नसून, संपूर्ण महामार्गावर अशीच स्थिती असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे, सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन टोल कंपन्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

No comments: