शासन आदेशाची पायमल्ली : जयसिंगपूरात परमीट रूम बार खुलेआम सुरू.
शासन आदेशाची पायमल्ली : जयसिंगपूरात परमीट रूम बार खुलेआम सुरू.
----------------------------------
जयसिंगपूर प्रतिनिधी
----------------------------------
"मी सुट्टीवर आहे" – दुय्यम निरीक्षक विसर्जनाला; उत्पादन शुल्क अधीक्षकाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष.
राज्य शासनाच्या आदेशानंतरही जयसिंगपूर शहरात तसेच परिसरात परमीट रूम व बिअर बार सर्रासपणे व कायमस्वरूपी सुरू असल्याचे वास्तव नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. शासनाने जारी केलेले परिपत्रक पायदळी तुडवत परमीट रूम्स चालू ठेवण्यात येत असल्यामुळे “शासनाचा परिपत्रक कशाला?” असा सवाल शहरात आणि परिसरात चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे.
अनंत चतुर्थीच्या गणेश विसर्जनाच्या दिवशीसुद्धा हे बार खुले असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या संदर्भात चौकशी केली असता दुय्यम निरीक्षक सही इनामदार यांनी "मी सुट्टीवर आहे" असे सांगत जबाबदारी टाळली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
या सर्व प्रकरणावर आता राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक काय निर्णय घेणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले असून, बेकायदेशीर सुरू असलेल्या या बारवर ठोस कारवाई होणार का, याबाबत उत्सुकता आहे.
No comments: