कागलमध्ये सरकार ग्रुपतर्फे गणेश महाआरती व संत बाळूमामा भंडारा उत्सव उत्साहात साजरा.

 कागलमध्ये सरकार ग्रुपतर्फे गणेश महाआरती व संत बाळूमामा भंडारा उत्सव उत्साहात साजरा.

 -------------------------------

सलीम शेख

-------------------------------

  : येथील अनंत रोटो परिसरात सरकार ग्रुपच्या वतीने एक भव्य गणेश महाआरती व संत बाळूमामा भंडारा उत्सव उत्साहात पार पडला. या दैवी सोहळ्यात गणेश महाआरती, संत बाळूमामा भंडारा, पालखी सोहळा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम संत बाळूमामा व हालसिद्धनाथ महाराज भाकणूककार  डोणे महाराज वाघापूरकर यांच्या सानिध्यात पार पडला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून कागलचे अधिपती व शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीमंत राजे समरजितसिंहजी घाटगे उपस्थित होते.

सरकार ग्रुपचे आधारस्तंभ व कागलचे माजी नगरसेवक धैर्यशील उर्फ भैया इंगळे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. या दैवी उपक्रमामध्ये परिसरातील हजारो भक्त, पदाधिकारी, नागरिक, तसेच ग्रुपचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाची चर्चा सध्या संपूर्ण कागल तालुका आणि शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे श्रीमंत राजे समरजितसिंहजी घाटगे आणि वहिनीसाहेब श्रीमंत राजे नवोदिता घाटगे यांनी गणेश चतुर्थीपासून गेले आठ दिवस संपूर्ण कागल तालुका, गडहिंग्लज तालुका, कागल शहर, आणि मुरगुड येथील गणेश आरतीस उपस्थित राहून गणेश मंडळांना गणेशोत्सवाबाबत मार्गदर्शन केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.

या महाआरती, पालखी सोहळा आणि महाप्रसाद सोहळ्याला प्रमुख उपस्थितीमध्ये डायरेक्टर सुशांत कालेकर आणि सामाजिक कार्यकर्ते शिवगोंडा पाटील यांचा सहभाग होता. याशिवाय, उद्योजक सुंदर कलानी, भालचंद्र बोने, सचिन सावंत, धनंजय पिष्टे, आप्पासो डोंगळे, सिद्धिविनायक ट्रस्टचे उपाध्यक्ष कुंडलिक हिरगडे महाराज, प्रमुख मार्गदर्शक नितीन बेळकट्टी, अध्यक्ष अक्षय वसगडे, उपाध्यक्ष दादू माळी, अक्षय यादव, आयर्न गाडेकर तसेच इतर सर्व सदस्य, भक्त आणि नागरिक उपस्थित होते.

या संपूर्ण दैवी उपक्रमाला सरकार ग्रुपमधील पदाधिकारी आणि भक्तांचे मोलाचे सहकार्य लाभले. डोणे महाराज आणि श्रीमंत राजे समरजितसिंहजी घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.