हातकणंगले: माले फाटा येथे दोन गटांमध्ये वाद, १३ जणांवर गुन्हा दाखल.
हातकणंगले: माले फाटा येथे दोन गटांमध्ये वाद, १३ जणांवर गुन्हा दाखल.
------------------------------
शशिकांत कुंभार
------------------------------
हातकणंगले: येथील माले फाटा चौकाजवळ दोन गटांत झालेल्या वादानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हातकणंगले पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
४ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता माले फाटा येथे काही तरुणांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर मारामारीत होऊन सार्वजनिक शांततेचा भंग झाला. आरडाओरडा आणि गोंधळामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही गटांना शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी दोन्ही गटांतील एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
No comments: