करवीर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ द्या रिपब्लिकन सेनेने केली मागणी.
करवीर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ द्या रिपब्लिकन सेनेने केली मागणी.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झाल्यामुळे करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, वडगणे , केलीॅ , सोनतळी, बहिरेश्वर, आरे ,व गड मुडशिंगी, आंबेवाडी, वळीवडे, या करवीर तालुक्यामध्ये पुराच्या पाण्यामुळे व अतिवृष्टी झालेल्या गावामध्ये,, शेतामध्ये पाणी साचून मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या गावांमधील पुराच्या पाण्याने वेडा घातल्यामुळे पुराचे पाण्यामध्ये ऊस बुडाला असून अतिवृष्टीमुळे घराची पडझड ही झाली आहे .शेतीच्या मिळणाऱ्या उत्पन्नापासून शेतकरी राजा आपला उदरनिर्वाह करत असून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हातबल झाला आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून मागील वर्षाच्या तुलनेत कमी करण्यात आलेले अनुदानित रक्कम वाढवून शेतकरी व पीडितांना त्वरित रक्कम बँकेच्या खात्यात जमा करण्यात यावी ही विनंती..!
निवेदन स्वीकारताना
मा शिवाजी गवळी
निवडणूक नायब तहसीलदार करवीर
निवेदन देताना
मा भीमराव गोंधळी करवीर तालुका अध्यक्ष रिपब्लिकन सेना
तानाजी काळे जिल्हा संघटक, अर्जुन गोधळी महासचिव, संतोष कांबळे सचिव, अर्जुन कांबळे महासचिव, विकास बाचणे, संदीप गोंधळी कोषाध्यक्ष,शिवाजी कांबळे करवीर संघटक, रमेश जाधव, रविराज पोवार, बाळू पोवार, रावसाहेब चव्हाण, अनिल चव्हाण, आनंद चव्हाण, रवी चव्हाण, भीमराव माने उपस्थित होते
Comments
Post a Comment