निढोरीत 'ओम साई'च्या मोदक स्पर्धेत तनुजा सुतार ठरल्या विजेत्या.

 निढोरीत 'ओम साई'च्या मोदक स्पर्धेत तनुजा सुतार ठरल्या विजेत्या.

 ------------------------------

जोतीराम कुंभार

------------------------------

     निढोरी ताः कागल येथील ओम- साई कला, क्रीडा, सांस्कृतिक युवा मंच प्रणित सुवर्ण गणेश मंदिर (गोल्डन टेम्पल )मार्फत घेण्यात आलेल्या अनोख्या मोदक बनवण्याच्या स्पर्धेत सौ. तनुजा विनायक सुतार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक सौ. दुर्गेशा विशाल पाटील आणि तृतीय क्रमांक सौ. माधुरी अमित सुतार यांना मिळाला. उत्तेजनार्थ बक्षिसाच्या मानकरी कु. आराध्या युवराज भाकरे

व कु. आराध्या घनश्याम गोसावी ठरल्या.

     बक्षीस वितरण सौ. रजिता राजेंद्र सुतार, सौ वृषाली विश्वास दरेकर, डॉ. सौ. सविता सचिन मोरबाळे, सौ. जयश्री हिम्मत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेची मांडणी व नियोजन सौ. वंदना संजय सुतार व सौ. मिनाक्षी संतोष शिंदे यांनी केले. ओम साई गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विश्वंभर पाटील यांनी स्वागत, उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविक तर सुत्रसंचालन संतोष शिंदे यांनी केले. खजिनदार शशिकांत जाधव यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.