पुनाळमध्ये तरुणांची आत्महत्या.
पुनाळमध्ये तरुणांची आत्महत्या.
--------------------------
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
--------------------------
कळे:- पुनाळ येथील ओंकार निवास पाटील (वय २५ ) या अविवाहित तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.याबाबत सीपीआर पोलीस चौकीत नोंद झाली आहे.अधिक माहिती अशी की, येथील ब्राम्हण गल्लीत निवास पाटील आपल्या कुटुंबासह राहतो.आई वडिल शेती करतात तर निवास हा ईतरांच्या वाहनांवर चालक म्हणून काम करतो.रविवार (ता.०७) रोजी सायंकाळी आई-वडिल व ओंकार यांच्यात घरगुती कारणावरुन वाद झाला.याच रागातुन ओंकारने दारुच्या नशेत साडेसातच्या सुमारास आपल्या राहत्या घरी वरील मजल्यावर साडीने गळफास घेतला.वडीलांच्या लक्षात आल्यानंतर ओंकारला उपचारासाठी सीपीआर येथे उपचारासाठी हलविण्यात आले.पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.पहाटे तीन वाजता ओंकारवर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या मागे आई, वडील,बहिण असा परिवार आहे.रक्षाविसर्जन मंगळवार (ता.०९ )रोजी सकाळी आहे.
कोल्हापूर विभाग.

No comments: