Header Ads

इचलकरंजीत तरुणावर प्राणघातक हल्ला; शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

इचलकरंजीत तरुणावर प्राणघातक हल्ला; शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

---------------------------

 सलीम शेख 

---------------------------

इचलकरंजी: जुन्या वैमनस्यातून एका २५ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना इचलकरंजी शहरात घडली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजता बजाज फायनान्ससमोर, कामगार चाळ परिसरात ही घटना घडली. फिर्यादी निखिल नितीन घाडगे (वय २५) यांच्यावर आशादुल्ला हारून जमादार (वय २७) याने हल्ला केला. या हल्ल्यात निखिल घाडगे गंभीर जखमी झाले आहेत.

जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. या घटनेनंतर जखमी निखिल यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी आरोपी आशादुल्ला जमादार याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.