मंत्री हसन मुश्रीफ व रणजीतसिंह पाटील यांच्या हस्ते देवीची महाआरती.
मंत्री हसन मुश्रीफ व रणजीतसिंह पाटील यांच्या हस्ते देवीची महाआरती.
-------------------------------
जोतीराम कुंभार
-------------------------------
राजेखान जमादार यांच्या आरजे ग्रुपच्या नवरात्र उत्सवात मान्यवरांची उपस्थिती.
मुरगुड (ता. कागल) येथे बाळासाहेब जमादार विविध विकास संस्था व आरजे ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गावभागातील जुन्या मशिदीसमोर आयोजित नवरात्र उत्सवात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व गोकुळचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील यांच्या हस्ते देवीची महाआरती संपन्न झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार हेही मंचावर उपस्थित होते.
आरतीच्या निमित्ताने मुश्रीफ, रणजीतसिंह पाटील व राजेखान जमादार हे तिघे एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब जमादार विविध विकास संस्थेच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाआरतीसाठी मंत्री मुश्रीफ व रणजीतसिंह पाटील यांना खास आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी आरजे ग्रुपतर्फे दोन्ही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला बिद्रीचे संचालक रंगराव पाटील, राजू पाटील, देवानंद पाटील, सुनील सूर्यवंशी, विश्वजीत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील, संतोष वंडकर, बजरंग सोनुले, दत्तात्रय जाधव, बी.एम. पाटील, राजू भारमल, अमर सणगर, विशाल सूर्यवंशी, डॉ. सुनील चौगले, डॉ. अशोक खंडागळे, फिरोज जमादार, नामदेव भांदीगरे, राजू आमते, विनोद रणवरे, अमर देवळे, रणजित मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments :
Post a Comment