देऊळवाडीत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद: पोषण आहार प्रदर्शन ठरले विशेष आकर्षण.
देऊळवाडीत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद: पोषण आहार प्रदर्शन ठरले विशेष आकर्षण.
देऊळवाडी ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अभियानांतर्गत महिलांची रक्त तपासणी, ईसीजी तपासणी तसेच आवश्यक ते औषधोपचार करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनिता पाटील होत्या.
यावेळी डॉ. डॉ.स्वाती चौगले यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, महिला ही कुटुंबाचा खरा आधार आहे. शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता टाळण्यासाठी व चांगल्या आरोग्यासाठी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आरोग्य सेवक संदीप नाईक व लीला पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून महिलांना स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.
अभियानाचा एक महत्त्वाचा भाग ठरला तो पोषण आहार प्रदर्शनाचा. अंगणवाडीत येणाऱ्या लहानग्यांना योग्य पोषण मिळावे यासाठी महिलांनी पौष्टिक पदार्थ बनवून सादर केले. या उपक्रमाचे विशेष कौतुक झाले. प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी कुलदीप देसाई यांनी केले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी समीर तडस, फारुख तहसीलदार, रुपेश पांढरे उपसरपंच कविता सावर्डेकर, सदस्य सुभाष पाटील, सुनिता पाटील, संभाजी कांबळे, संगीता कांबळे, सुवर्णा गुरव, बाबुराव पाटील आदींसह महिला बचत गटांचे पदाधिकारी, महिला उपस्थित होत्या.
फोटो: देऊळ वाडी येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. स्वाती चौगुले, व्यासपीठावर सरपंच सुनिता पाटील व इतर
No comments :
Post a Comment