साताऱ्यात फोटोग्राफर बंधूंचा महामेळावा.
साताऱ्यात फोटोग्राफर बंधूंचा महामेळावा.
--------------------------------
शेखर जाधव
--------------------------------
कीर्ती स्टोअर्स पुणे आयोजित मिनी एक्स्पोला जिल्ह्यातून तब्बल २५० फोटोग्राफरांचा उत्स्फूर्त सहभाग.
फोटोग्राफर बांधवांसाठी ज्ञान, अनुभव व आधुनिक उपकरणांची देवाणघेवाण व्हावी या हेतूने कीर्ती स्टोअर्स पुणे यांच्या वतीने साताऱ्यातील प्रसिद्ध हॉटेल ओम एक्झिक्युटिव्ह येथे एकदिवसीय फोटोग्राफर मिनी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले. या एक्स्पोला सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून तसेच परिसरातील भागांतून तब्बल २५० पेक्षा जास्त फोटोग्राफर बांधवांनी हजेरी लावली.
या कार्यक्रमासाठी साताराचे वेडिंग फोटोग्राफी क्षेत्रातील अनुभवी
मार्गदर्शक प्रमोद गायकवाड सर Cavok सर्व्हिस पुणेचे सुप्रसिद्ध सुमित जैन सर यांचे विशेष सहकार्य लाभले. उपस्थितांना फोटोग्राफी व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, उपकरणांची माहिती, प्रकाशयोजना, एडिटिंगमधील नवीनतम साधने तसेच व्यवसाय वृद्धीसाठीच्या उपयुक्त टिप्स देण्यात आल्या.
कार्यक्रमात फोटोग्राफर बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. एकमेकांशी अनुभवांची देवाणघेवाण, व्यावसायिक जाळे (नेटवर्किंग) वाढवणे आणि साताऱ्यातून एक मजबूत फोटोग्राफर समुदाय
कोरेगाव फोटोग्राफी अससोसिएशन चे कदम सर दहिवडी अससोसिएशन चे कांबळे नितीन वाघमोडे कुलकर्णी वाई चे कुणाल शहा अमित, क्षीरसागर प्रशांत, साताराचे घाडगे, गणेश बाचल, गजानन शिंदे, धर्माधिकारी, राजेश पाटील, महाबश्वर चे चोरगे मेढा येथील चंदु चिकणे,सचिन जंगम,संतोष सांगवेकर,शेखर जाधव यांच्या उपस्थितीत
सकारात्मक चर्चा झाली.
एक्स्पोच्या यशस्वीतेनंतर कीर्ती स्टोअर्स पुणेचे श्री. लालचंद सर यांनी, “यापुढेही सातारा जिल्ह्यात दरवर्षी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवले जातील. फोटोग्राफी क्षेत्रातील प्रत्येक बांधवापर्यंत तंत्रज्ञानाची दारे खुली व्हावीत हा आमचा प्रयत्न असेल,” असे आश्वासन दिले.
या मिनी एक्स्पोमुळे सातारा जिल्ह्यातील फोटोग्राफर बांधवांसाठी एक नवा उत्साह, प्रेरणा आणि व्यावसायिक प्रगतीची नवी दिशा उपलब्ध झाली आहे.
Comments
Post a Comment