एन एच पाटील वारणा विद्यापीठाचे पहिले कुलाधिकारी राज्यपाल राधाकृष्णन् यांच्या आदेशाने नियुक्ती / वारणा परिसरातूंन अभिनंदनाचा वर्षाव.

 एन एच पाटील वारणा विद्यापीठाचे पहिले कुलाधिकारी  राज्यपाल राधाकृष्णन् यांच्या आदेशाने नियुक्ती / वारणा परिसरातूंन अभिनंदनाचा वर्षाव.

 -----------------------------------------

बच्चे सावर्डे प्रतिनिधी 

सुनिल पाटील 

-----------------------------------------

वारणानगर : वारणा  विद्यापीठाचे पहिले कुलाधिकारी (प्रोवोस्ट) म्हणून नामदेव हिंदुराव उर्फ एन एच पाटील यांची महाराष्ट्र शासनाकडून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या आदेशान्वये ही नियुक्ती करण्यात आली आहे.

 कुलाधिकारी श्री.पाटील हे पारगांवचे सुपुत्र असून तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती सहकारी संस्थेचे अध्यक्ष,सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष,

वारणा साखर कारखान्याचे तज्ञ संचालक यासह विविध संस्थांची महत्वाची धुरा ते यशस्वीपणे सांभाळत आहेत वारणा समुहाचे प्रमुख आमदार डॉ.विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली सन २००६ ला सुराज्य फाऊंडेशनची स्थापना झाली.कृषी, शैक्षणिक,सामाजिक,धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत ही संस्था भरीव काम करीत असून ग्रामीण विकास,सहकार आणि सर्वांगीण प्रगतीसाठी झटणारी संस्था म्हणून पाहीले जाते स्थापनेपासून दरवर्षी युपीएससीतील यशवंताचा सन्मान सुराज्य फौडेंशनमार्फत वारणेत केला जातो त्याचे श्रेय श्री.पाटील यांना जाते.वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली येथून बॅचलर ऑफ मेकॅनिकल इंजि.(बी.ई ) विशेष प्राविण्यासासह प्रथम  श्रेणी,मास्टर ऑफ मेकॅनिकल इंजि.(एम.ई ) अशी उत्तुंग झेप शिक्षण क्षेत्रात घेतली श्री.पाटील यांनी यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग खात्यातील अतिमहत्वाच्या महाव्यवस्थापक पदावर त्यांनी काम केले सरकारी, सहकारी,खाजगी क्षेत्रातील भरीव अनुभव त्यांना आहे. चीन,जर्मनी, फ्रान्स,स्वित्झर्लंड, हॉलंड,सिंगापूर,दुबई, ऑस्ट्रेलिया,इटली यासह बारांहून अधिक देशांचा अभ्यास दौरा त्यांनी केला असून वारणा विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय प्रगतीसाठी त्यांच्या अनुभवाचा मोठा उपयोग होणार आहे.

वारणा उद्योग शिक्षण समूहाचे प्रमुख आमदार डॉ.विनय कोरे,वारण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, वारणा विभाग शिक्षण मंडळाचे सीईओ डॉ.व्ही.व्ही. कारजिन्नी यांनी कुलाधिकारी श्री. पाटील अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या या निवडीबद्दल त्यांचे वारणा परिसरातूंन अभिनंदन होत आहे.

.....

वारणा विद्यापीठाचा नावलौकीक  वाढणार : 

वारणा विद्यापीठाची स्थापना झालेनंतर सर्वप्रथम वारणा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ.डी.टी. शिर्के यांची नियुक्ती झाली त्यांनी पदाची सूत्रे हाती घेतलेनंतर आता याच वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी म्हणून

एन एच पाटील यांची

राज्यपालांनी नियुक्ती झाली त्यामूळे वारणा विद्यापीठाचा नावलौकीक वाढणार आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.