रक्तदानातून जनसेवा – उदय दादांचे १०० वे रक्तदान समाजासाठी प्रेरणादायी.
रक्तदानातून जनसेवा – उदय दादांचे १०० वे रक्तदान समाजासाठी प्रेरणादायी.
------------------------------------
बच्चे सावर्डे प्रतिनिधी
सुनिल पाटील
--------------------------------------
शनिवार, दि. ७ सप्टेंबर अनंत चतुर्दशी या दिवशी थॅलेसेमिया निर्मूलन असोसिएशन, कोल्हापूर संस्थेचे सदस्य तसेच रक्तदाता कोल्हापूर समूहातील निस्वार्थी रक्तदाता श्री. उदय दादा पवार यांनी आपले १०० वे रक्तदान करून एक अतुलनीय कार्य पूर्ण केले आहे.
आजपर्यंत त्यांनी सुमारे ३० वेळा होल ब्लड डोनेशन आणि ७० वेळा प्लेटलेट्स डोनेशन केले असून, समाजसेवेच्या या कार्यातून असंख्य रुग्णांना नवजीवन दिले आहे.
उदय दादा, आपण आमच्या संस्थेचे आणि रक्तदात्यांच्या समूहाचे सदस्य असल्याचा आम्हाला मनापासून अभिमान आहे. तुमच्या या १०० व्या रक्तदानाच्या कार्याला प्रत्यक्ष साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले, यासाठी मी स्वतःला धन्य समजतो.
तुमच्या या समाजकार्यासाठी तुम्ही नेहमी निरोगी, तंदुरुस्त आणि आनंदी राहा हीच अंबाबाई चरणी प्रार्थना.उदय दादा, आपल्या या अद्वितीय जनसेवेला शतशः नमन!
खरंच, तुमच्याकडे पाहून आम्हाला समाजकार्यासाठी नवी ऊर्जा मिळते. तुमच्या या अमूल्य कार्याला मानाचा मुजरा.
अशीच जनसेवेची वाटचाल तुमच्याकडून सतत घडत राहो आणि श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना की तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो.

No comments: