सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांचे वर्चस्व बाजार भोगाव परिसरातील तरुण मंडळांनी दिला डॉल्बीला फाटा महिलांनी धरले झिम्मा फुगडी चे फेर.
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांचे वर्चस्व बाजार भोगाव परिसरातील तरुण मंडळांनी दिला डॉल्बीला फाटा महिलांनी धरले झिम्मा फुगडी चे फेर.
----------------------------
सुदर्शन पाटील
----------------------------
बाजारभोगाव परिसरातील बाजारभोगाव, पिसात्री, किसरूळ, पडसाळी, चाफेवाडी, पोहाळे तर्फे बोरगाव, पोर्ले तर्फे बोरगाव, पाटपन्हाळा व कोलीक या गावांमधील सार्वजनिक मंडळांनी विघ्नहर्त्याचे विसर्जन भक्तीमय वातावरणात केले. यावर्षी कळे पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सिस्टीमविरहित मिरवणुका काढण्यात आल्या.
बाजारभोगाव येथील बछडा ग्रुपची पाच तास चाललेली मिरवणूक विशेष आकर्षण ठरली. पारंपरिक हलगी, कैच्याळ यांच्या गजरात महिलांनी धरलेल्या झिम्मा-फुगडीच्या फेरामुळे मिरवणुकीला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. पिसात्री येथे ढोलताशांचा गजर, किसरूळ येथील आदर्श युवा कला क्रीडा मंडळाची भजन व झिम्मा-फुगडीच्या पारंपरिक पद्धतीतील मिरवणूक, तर चाफेवाडीतील लेझीम-झांज पथक आणि पडसाळीतील ढोलताशा विशेष ठरले.
संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पडावी म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस व होमगार्डचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
चौकट
गेल्या दशकात सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये डीजेची संस्कृती वाढीस लागली होती त्यामुळे ढोल-ताशा लेझीम हालगी यासारख्या पारंपारिक वाद्यांचा विसर पडला होता मात्र यावर्षी ग्रामीण भागातील तरुण कर्णकर्कश डॉल्बीला फाटा देत पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणूक काढल्यामुळे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत होते
फोटोओळ – बाजारभोगाव येथील बछडा ग्रुपच्या विसर्जन मिरवणुकीत महिलांनी धरलेला झिम्मा-फुगडीचा फेर.
No comments: