हातकणंगले बसस्थानकाजवळ असलेल्या साई कॉलनीमध्ये दगडफेकीमुळे भीतीचे वातावरण.
हातकणंगले बसस्थानकाजवळ असलेल्या साई कॉलनीमध्ये दगडफेकीमुळे भीतीचे वातावरण.
------------------------------
संस्कार कुंभार
------------------------------
हातकणंगले: हातकणंगले बसस्थानकाजवळ असलेल्या साई कॉलनीमध्ये दिवसाढवळ्या एका अनोळखी व्यक्तीने केलेल्या दगडफेकीमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना काल घडली असून, आरोपी परराज्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
या व्यक्तीने नशेच्या भरात कॉलनीमधील घरांवर दगडफेक सुरू केली. त्यामुळे परिसरात गोंधळ आणि भीतीचे वातावरण पसरले. स्थानिकांनी तातडीने धाडस दाखवत त्याला पकडले आणि त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला हातकणंगले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या घटनेमुळे कॉलनीतील रहिवासी दहशतीत असून, पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.
Comments
Post a Comment