Header Ads

🚨 मिरज पोलिसांची कारवाई : २ किलो तयार गांजासह दोघांना अटक; ₹१.२० लाखांचा मुद्देमाल जप्त.

 🚨 मिरज पोलिसांची कारवाई : २ किलो तयार गांजासह दोघांना अटक; ₹१.२० लाखांचा मुद्देमाल जप्त.

मिरज (राजु कदम):

महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या पथकाने “नशामुक्त भारत अभियान” अंतर्गत मिरज शहर परिसरात धडक कारवाई करत दोन अज्ञात व्यक्तींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून २ किलो तयार गांजा व दुचाकीसह एकूण ₹१,२०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, पोलिसांना मिरज परिसरात काही व्यक्ती गांजाची विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. कारवाईदरम्यान दोन व्यक्ती संशयितरित्या गांजा विक्री करताना आढळले. पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यांच्या जवळ २.०६ किलो तयार गांजा आढळला.

सदर गांजाची किंमत सुमारे ₹५०,००० असून, त्याचबरोबर वापरण्यात आलेली दुचाकी अ‍ॅक्टीवा (किंमत ₹६०,०००) जप्त करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण ₹१,२०,००० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा र.क्र. ३४५/२०२५ असा दाखल करण्यात आला असून, आरोपींवर अंमली पदार्थ नियंत्रण अधिनियम १९८५ च्या कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिस निरीक्षक संदीप गुरव, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, सुलभा कांबळे, पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे, विनोद चव्हाण, विजय शिंदे, मोरबाळ निनमसे, चालक सुरेश कांबळे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

“नशामुक्त भारत अभियान” अंतर्गत मिरज पोलिसांनी केलेली ही कारवाई उल्लेखनीय ठरली असून शहरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांना धडा शिकवणारी ठरली आहे. पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पथक करत आहे.

No comments:

Powered by Blogger.