आमदार डॉ. विनयराव कोरे यांच्या फंडातून आरळे येथील गोसावी समाज मंदिरासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर
आमदार डॉ. विनयराव कोरे यांच्या फंडातून आरळे येथील गोसावी समाज मंदिरासाठी १० लाख रुपयांचा निधी मंज
सातवे प्रतिनिधी:
आमदार डॉ. विनयराव कोरे यांच्या फंडातून आरळे येथील गोसावी समाज मंदिराच्या बांधकामासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी आनंदराव घाटगे आणि डॉ. अभिजित घाटगे यांच्या विशेष प्रयत्नातून प्राप्त झाला असून, या मंजुरीमुळे गोसावी समाज बांधवांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये माजी सरपंच संजय घाटगे, विश्वास पायमल, शिवनाथ मायंदे, अमित घाटगे, के.बी. मोरे, अशोक चव्हाण, लालासो लोहार, दिग्विजय पायमल, तुषार पाटील, तानाजी पाटील, संजय लोहार, चंद्रकांत मायंदे, बबन पोवार, सागर पोवार, सुरेश पोवार, दिलीप पोवार, महिपती पोवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी आनंद ग्रुपचे सर्व कार्यकर्ते तसेच गोसावी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोसावी समाज मंदिराच्या पायाभरणी सोहळ्याच्या वेळी आनंद शिक्षण समूहाचे संस्थापक आनंदराव घाटगे व ग्रामस्थ उपस्थित राहिले.
या निधी मंजुरीबद्दल आनंद प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि गोसावी समाज बांधवांनी आमदार डॉ. विनयराव कोरे, आनंदराव घाटगे व डॉ. अभिजित घाटगे यांचे मनःपूर्वक आभार मानले.

No comments: