सहकाराचा दीपस्तंभ असणाऱ्या शिवकृपा पतपेढीची, सहकाराला संजीवनी देणारी, शिवकृपा सहकार मॅरेथॉन - डॉ. यशवंत पाटणे.
सहकाराचा दीपस्तंभ असणाऱ्या शिवकृपा पतपेढीची, सहकाराला संजीवनी देणारी, शिवकृपा सहकार मॅरेथॉन - डॉ. यशवंत पाटणे.
**********************
प्रतिनिधी/ शेखर जाधव
**********************
सातारा जावली
सहकाराचा दीपस्तंभ असणाऱ्या शिवकृपा सहकारी पतपेढीच्या वतीने रविवार दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी सातारा येथे सलग तिसऱ्या वर्षी शिवकृपा सहकार मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
सहकार क्षेत्र हे पक्षीय नसून ते लोककल्याणाचे क्षेत्र असते. शिवकृपा पतपेढी ही सहकारातील दिपस्तंभ आहे. पतपेढीतील कर्मचारी आणि प्रतिनिधी यांचे आरोग्य निरोगी आणि सुदृढ रहावे म्हणून संस्था गेली तीन वर्ष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करीत आहे, ही मॅरेथॉन सहकाराला संजीवनी देणारी आहे. हा आदर्श इतर सहकारी पतसंस्थांनी घेतला पाहिजे, असे उद्गार प्रख्यात वक्ते, जेष्ठ विचारवंत आणि निवृत्त प्राचार्य मा. डॉ. यशवंत पाटणे यांनी काढले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त शिवकृपा पतपेढीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.
सहकार क्षेत्रात अर्थकारणाला अध्यात्माची जोड देत सामाजिक आरोग्याचा संदेश देणारी शिवकृपा सहकार मॅरेथॉन असल्याचे गौरवोद्गार मा. डॉ. किरण सोनावणे, जिल्हा निबंधक, मुंबई उपनगरे यांनी काढले.
स्पर्धेची सुरूवात शाहू स्टेडियम येथून सकाळी 6.30 वाजता झाली. यावेळी मा. डॉ. किरण सोनावणे, जिल्हा उपनिबंधक, मुंबई उपनगरे, मा. डॉ. श्री. मिलिंद शहा, प्रसिध्द धन्वंतरी, मा. डॉ. एल. डी. कदम, प्राचार्य, डि. पी. भोसले, कॉलेज, कोरेगाव, डॉ. सुरेश साळुंखे, प्राचार्य, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे, संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष गोरख चव्हाण, संस्थापक व उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी व सर्व संचालक यांनी सहकार ध्वज दाखवल्यानंतर स्पर्धेला सुरूवात करण्यात आली. संस्थेचे कर्मचारी, ठेव संकलन प्रतिनिधी, सभासद व कर्मचाऱ्यांचे पाल्य अशा जवळपास 1500 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. शाहू स्टेडियम पासून सुरू झालेली ही स्पर्धा करंजे, मोळाचा ओढा मार्गे मेढा रस्ता व त्याच मार्गाने पुन्हा शाहू स्टेडियम या ठिकाणी समाप्त झाली. स्पर्धेनंतर आयोजित कार्यक्रमात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सकाळच्या निसर्गरम्य वातारवरणात सुरू झालेल्या या स्पर्धेमध्ये धावपटुंसाठी जागोजागी पाणी, एनर्जी ड्रिंक, चिक्की, गोळया व प्रथमोपचार आदींची व्यवस्था करण्यात आली होती. हलगीच्या कडकडाटात धावपटुंना प्रोत्साहन दिले जात होते.
सहकाराला अध्यात्माची जोड देत शिवकृपा काम करत आहे. त्यामुळे ”एक धाव शिवकृपासाठी, शिवकृपाची धाव सहकारासाठी“ या घोषवाक्यावर आधारीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम ही काळाची गरज आहे. आणि प्रत्येकाने आपल्या तब्बेतीची काळजी घेताना प्रतिदिन धावणे गरजेचे आहे. शिवकृपा नेहमीच आपल्या कर्मचारी, प्रतिनिधी व सभासदांच्या उत्तम आरोग्यासाठी आग्रही असून याच संकल्पनेतून गेले तीन वर्ष संस्थेतर्फे शिवकृपा मॅरेथॉनचे आयोजन करीत असल्याचे संस्थापक व अध्यक्ष श्री. गोरख चव्हाण यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.
स्पर्धेच्या पारितोषीक वितरण समारंभाप्रसंगी मा. डॉ. किरण सोनावणे, जिल्हा निबंधक, मुंबई उपनगरे, मा. डॉ. श्री. मिलिंद शहा, प्रसिध्द धन्वंतरी, मा. श्री. नितीन तारळकर, जिल्हा क्रिडा अधिकारी, सातारा. मा. श्री. यशवंत पाटणे, जेष्ठ विचारवंत व निवृत्त प्राचार्य, मा. डॉ. एल. डी. कदम, प्राचार्य, डि. पी. भोसले, कॉलेज, कोरेगाव, मा. डॉ. श्री. सचिन भोसले, एम.डी. होमिओपेथी, ऍड. शिवाजीराव मर्ढेकर, उपाध्यक्ष, अजिंक्यतारा साखर समूह, सोनगाव, तसेच मा. श्रीमती. संध्या चौगुले, हरित क्रांतीच्या प्रणेत्या इ. मान्यवर यावेळी उपस्थित होते.
तसेच संस्था नेहमीच असे विविध उपक्रम राबवित राहील व त्यामाध्यमातून सभासदांचा, ग्राहकांचा, विश्वास जोपासत संस्था लवकरच रू. 6,000 कोटींच्या संमिश्र व्यवसायाचा टप्पा पुर्ण करेल असा विश्वास यावेळी संस्थापक व उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत वंजारी यांनी यावेळी व्यक्त केला.
या मॅरेथॉन मध्ये ठेव संकलन प्रतिनिधींच्या वयोगटानुसार पुरूषांमध्ये 18 ते 30 योगेश निंबाळकर, 31 ते 45 श्री. जय गायकवाड, 46 ते 60 श्री. प्रकाश चव्हाण, 61 व त्यापुढे श्री. राजेंद्र जाधव यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केले. तसेच ठेव संकलन प्रतिनिधींच्या वयोगटानुसार महिलांमध्ये 18 ते 30 सिध्दी लावंड, 31 ते 45 ललीता लावंड, 46 ते 60 प्रतिभा पिसाळ यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केले.
कर्मचाऱ्यांच्या वयोगटानुसार पुरूषांमध्ये 18 ते 30 निसर्ग नावडकर, 31 ते 45 अमोल शेळके, 46 ते 60 संदिप शिर्के यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केले. तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या वयोगटानुसार 18 ते 30 स्वप्नाली काटवटे, 31 ते 45 प्रतिक्षा दुधाने, 46 ते 60 मनिषा मालुसरे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केले.
सभासदांच्या वयोगटानुसार पुरूषांमध्ये 18 ते 30 प्रतिक दळवी, 31 ते 45 सचिन निकम, 46 ते 60 विठ्ठल अरगडे, 61 च्या पुढे अजित कंबोज यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केले. तसेच महिला सभासदांच्या वयोगटानुसार 18 ते 30 दिशा फडतरे, 31 ते 45 दिपाली किर्दत, 46 ते 60 वैशाली महामुनी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केले.
कर्मचारी पाल्यांच्या वयोगटानुसार मुलांमध्ये 10 ते 18 जयम फडतरे, तर मुलींमध्ये कु. अनिका जगदाळे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केले.
विजेत्यांना रोख परितोषिकांसह सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

No comments: