ता. आजरा : मेंढोली गावात रिपब्लिकन सेना शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न.
ता. आजरा : मेंढोली गावात रिपब्लिकन सेना शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न.
---------------
संस्कार कुंभार.
---------------
आजरा तालुक्यातील मेंढोली गावात रिपब्लिकन सेना शाखेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुणे रिपब्लिकन सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब कामत यांनी भाषण करताना सांगितले की,
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळवून देण्यासाठीचा ऐतिहासिक व निर्णायक लढा आनंदराज आंबेडकर यांनी दिला आणि तो यशस्वी केला. त्यांच्या नेतृत्वामुळे वंचित समाजाला नवा आवाज मिळाला आहे.”
यावेळी रिपब्लिकन सेना करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी यांनी सांगितले की,
“वंचित आणि उपेक्षित घटकांना सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकांमध्ये रिपब्लिकन सेना शिवसेना (शिंदे गट) सोबत ताकदीने उतरून लढणार आहे. इच्छुक उमेदवारांनी पक्षाशी संपर्क साधावा.”
कार्यक्रमात जिल्हा महासचिव अर्जुन कांबळे यांनी नव्याने निवड झालेल्या शाखा पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत पुढील कार्यासाठी प्रेरणा दिली.
जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कामत यांचा सत्कार आजरा तालुका संपर्कप्रमुख सुधाकर कांबळे व शाखा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप शाखा सचिव श्रावण कांबळे यांनी केला.
---
या वेळी उपस्थित
लक्ष्मण कांबळे (शाखा अध्यक्ष), काळू कांबळे (उपाध्यक्ष), बाळू कांबळे, श्रावण कांबळे (सचिव), तानाजी काळे (जिल्हा संघटक), सिताराम कांबळे, राज विक्रम कांबळे, शिवाजी कांबळे, सुरेश दिवेकर, विश्वजीत भोसले, लताबाई कांबळे, विलास कांबळे तसेच मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.

No comments: