Header Ads

रक्षकच बनला भक्षक.गांधींनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

 रक्षकच बनला भक्षक.गांधींनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


शशिकांत कुंभार.

-------------------

गांधीनगर. लग्न करतो म्हणून वारंवार पीडित महिलेवर अत्याचार करणाऱ्या सध्या चंदगड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार सुनील कुंभार व व 47 रा. तळसंदे याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल .

 याबाबत गांधीनगर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,

एका वर्षापूर्वी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक पिडित महिला फिर्याद देण्यासाठी आली होती या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार सुनील कुंभार यांच्याकडे प्रभारी आधीकारी यांनी सोपवला होता तपासादरम्यान पिडित महिला व पोलीस हवालदार यांचं प्रेम संबंध जुळले मी तुला आयुष्यभर सांभाळतो तुझ्या संपर्कात राहतो तुझ्याशी लग्न करतो असं आमिष दाखवत वेळोवेळी

त्यांने तिच्या घरी व अन्य ठिकाणी वेळोवेळी पीडित महिलेवर अत्याचार केला 

पीडित महिलेने लग्न करून एकत्र राहण्यासाठी आग्रह केला त्यावेळी दोघांच्या मध्ये वारंवार भांडण सुरू झाले  लग्न करण्यास नकार देऊन मारहाण करण्याची धमकी दिली म्हणून पीडित महिलेने गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनय झुंजुर्के  हे करत आहेत

No comments:

Powered by Blogger.