Header Ads

कोळशिंद्य (जंगली कुत्र्यांच्या) हल्ल्या १० शेळ्यांची कोकरे ठार फये पैकी धनगरवाडा येथे घटना.

 कोळशिंद्य  (जंगली कुत्र्यांच्या) हल्ल्या १० शेळ्यांची कोकरे ठार फये पैकी धनगरवाडा येथे घटना.

---------------------------------------

 कोल्हापूर प्रतिनिधी 

विजय बकरे

---------------------------------------

 फये (सोनबाचा वाडा) घरासमोरील बकऱ्यावर कोळशिद्यानी केलेल्या हल्लात १० शेळ्यांची कोकरे ठार झाली. ही घटना शुक्रवारी घडली. या घटनेमुळे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्यात  घबराट निर्माण झाली आहे.*

         *याबाबत सविस्तर माहिती अशी की भागोजी लक्ष्मण मल्गोडा राहणार फये ( सोनबाचा धनगर वाडा) तालुका भुदरगड  कोल्हापूर हे आपल्या बकऱ्या दारात ठेवून वैरण काढण्यासाठी  शेतात गेले होते.  शुक्रवारी (दि ३) रोजी सायंकाळी ५ वा. दरम्यान अचानक शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला शेळ्या का ओरडत आहेत हे पाहण्यासाठी भागोजी मलगोंडा हे पळत आपल्या घराकडे गेले तर समोर ६ कोळशिंद्याच्या (जंगली कुत्री) कळप  दारातील शेळ्यांच्या वरती तुटून पडला होता. समोरचे दृष्य पाहून भागोजी यांनी आरडाओरडा करत या कोळशिंबद्यांना पिटाळून लावले.* 

     *या हल्ल्यात त्यांच्या १० शेळ्या मृत्युमुखी पडल्या. या हल्ल्याची माहिती भागोजी मलगुंडे यांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना देऊन मदतीबाबत विनंती केली. संजय वाघमोडे यांनी ही माहिती तात्काळ गारगोटी येथील वनपाल बजरंग शिंदे यांना  कळवून तातडीने घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा करण्याची विनंती केली.* 

    *घटनास्थळी भुदरगडचे वनपाल बजरंग शिंदे, वनरक्षक निकिता चाळक वनिता कोळी कोंडीबा मलगोंडा धनाजी डावरे, यांनी उपस्थित राहून पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी  डॉ. नाईक यांनी मृत बकऱ्याचे शवविच्छेदन  केले यावेळी यशवंत क्रांती संघटनेचे फये शाखेचे पदाधिकारी भागोजी लक्ष्मण मलगोंडा, कोंडीबा सिधु मल‌गोंडा, माखू रामु मलगोंडा, विठ्ठल लक्ष्मण मलगोंडा , काळू लक्ष्मण मलगोंडा, बाबूराव सोनबा मलगोंडा, विष्णू पांडुरंग केसरकर, विठ्ठल रामू बाजारी, कोंडीबा रामु बाजारी, विठ्ठल गंगाराम बाजारी. इत्यादी उपस्थित होते.*

No comments:

Powered by Blogger.