दुधगंगा पुलावर भीषण अपघात : युवकाचा मृत्यू, अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
📰 दुधगंगा पुलावर भीषण अपघात : युवकाचा मृत्यू, अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल.
-------------------------------------
कागल प्रतिनिधी सलीम शेख
-----------------------------------
कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली परिसरातील दुधगंगा नदी पुलावर सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे ही दुर्घटना घडली असून, कागल पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मृत युवकाची ओळख दादा ज्ञानू पाटील (वय ३७, रा. करगणी, ता. आटपाडी, जि. सांगली) अशी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटील हे आपल्या स्प्लेंडर दुचाकीवर (क्र. MH-10-EH-2803) बाळूमामा आदमापूर येथून गावी परतत होते. रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास ते दुधगंगा पुलावर पोहोचले असता, समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेचा जोर इतका होता की दुचाकी पुलाच्या लोखंडी ग्रीलला अडकली, तर पाटील खाली नदीपात्रातील खडकांवर पडले, आणि जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर परिसरात एकच हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. फिर्यादी नितीन भिमराव खरात यांच्या तक्रारीवरून कागल पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
No comments: