मुदाळ आणि आदमापूर येथील प्राथमिक शाळेला देवमामांची मदत...
मुदाळ आणि आदमापूर येथील प्राथमिक शाळेला देवमामांची मदत...
शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते मुरगूडकर यांच्यातर्फे सत्कार.
-------------------------
मुरगूड/ जोतीराम कुंभार.
-----------------------------
आपण या समाजाचे देणे लागतो आणि आणि ते आपले कर्तव्य आहे, अशी मानसिकता मनाशी सतत बाळगून व निःस्वार्थी सेवाभाव जोपासत चंदगड तालुक्यातील आसगोळी (ता.चंदगड) येथील देवमामा पांडुरंग मारुती गुरव यांनी श्रद्धा आणि सेवाभावाची अनोखी सांगड घालत भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथील विद्या मंदिर प्राथमिक शाळेला तब्बल दोन लाख रुपयांची देणगी दिली आहे. या आधी त्यांनी येथील प्राथमिक शाळेला देखील देणगी दिली आहे गुरुवर्य शिवाजी आळवेकर मुदाळ आणि आदमापूर शाळेला मदतीचा धनादेश
यांचे शिष्य असलेले गुरव यांनी आई यल्लमा देवीचा जोगवा मागून जमा केलेल्या रकमेतील ही देणगी देत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
मुदाळ येथील विद्या मंदिर प्राथमिक शाळेला या देणगीतून मैदान बरोबरच शैक्षणिक साधनसामग्री, ग्रंथालय व इतर
देताना देवमामा पांडुरंग गुरव. शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्याचा
शाळा व्यवस्थापनाचा मानस आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक चांगले शैक्षणिक वातावरण लाभणार आहे यांच्या या समाजपयोगी कृतीबद्दल शिवभक्त मुरगुडकर यांच्या वतीने त्यांना फेटा बांधून आणि पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला शिवभक्त मूरगुडकर यांच्या वतीने समाजामध्ये विविधि सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात तसेच समाजाप्रती आदर्शवत कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार केला जातो यावेळी मुरगूड शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवभक्त सामाजिक कार्यकर्त सर्जेराव भाट, अनिल प्रभावळे, बाळासाहेब पाटील, किरण भाट, साताप्पा हिरवडे, अमोल वाईंगडे,ओंकार पोतदार, आनंदा रामाने, शिवाजी चौगले, जगदीश गुरव, तानाजी भराडे, प्रफुल कांबळे उपस्थित होते.
No comments: