Header Ads

गांधीनगर बाजारपेठेतील दुकाने फोडणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या.

 गांधीनगर बाजारपेठेतील दुकाने फोडणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या.

-----------------------

संस्कार कुंभार

-----------------------

उल्हासनगर येथे सापळा रचून रेहान शेख यास पकडले; चार साथीदार फरार.

कोल्हापूर, दि. ३० ऑक्टोबर :

दिवाळी सणादरम्यान गांधीनगर बाजारपेठेतील अनेक दुकाने फोडून चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून १,१०० रुपये रोख आणि मोबाईल हँडसेट असा एकूण १६,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


२३ ते २४ ऑक्टोबरदरम्यान गांधीनगर येथील ‘आयुष मेन्सवेअर’ या रेडीमेड कपड्यांच्या दुकानाचे शटर उचकटून १ लाख ७० हजार रुपये इतकी रोकड चोरीला गेली होती. तसेच शेजारील सात दुकानांत जबरी चोरीचा प्रयत्न झाल्याची तक्रार दुकानदार किशोर मोठवाणी यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली होती.


या प्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३३१(४), ३०५(अ) आणि ६२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.


गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष तपासाची जबाबदारी सोपवली. त्यानुसार निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वात तपास पथक कार्यरत झाले.


गोपनीय माहितीनुसार पथकाने उल्हासनगर (ठाणे) येथे सापळा रचून रेहान रईस शेख (वय १९, रा. टिटवाळा, ठाणे) याला अटक केली. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांची नावे सांगितली —

➡️ राजवीर लाहोरी,

➡️ प्रदीप निशाद,

➡️ अनिकेत यादव,

➡️ सलमान अन्सारी (सर्व रा. उल्हासनगर, ठाणे).


सदर चारही आरोपी सध्या फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांचा शोध सुरू आहे.


अटक आरोपीकडून चोरीतील १,१०० रुपये रोख आणि मोबाईल हँडसेट जप्त करून, त्याला आणि मुद्देमालासह गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रविंद्र कळमकर, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, तसेच त्यांचे सहकारी राजु कोरे, अमित मर्दाने, सचिन जाधव, अमित सर्जे, वैभव पाटील, प्रदीप पाटील, संजय हुंबे, संतोष बरगे, हंबीरराव अतिग्रे, सतिश सुर्यवंशी व शिवानंद मठपती यांनी पार पाडली

No comments:

Powered by Blogger.