Header Ads

वडगांव पोलिसांची मोठी कारवाई; गावठी पिस्तुल व कारसह एक इसम अटकेत १० लाख६० हजारांचा मुद्देमाल जप्त.

 वडगांव पोलिसांची मोठी कारवाई; गावठी पिस्तुल व कारसह एक इसम अटकेत १० लाख६० हजारांचा मुद्देमाल जप्त.

-----------------------------

सलीम शेख 

-----------------------------

 कोल्हापूर : वडगांव पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रात्री उशिरा वाठार परिसरात सापळा रचून एका इसमाला गावठी बनावटीचे पिस्तुल व कारसह अटक केली. या कारवाईत सुमारे ₹१०,६०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

 दिनांक २७ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारास वडगांव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांना माहिती मिळाली की, वाठार येथील शेरे पंजाब धाबा येथे एक इसम गावठी पिस्तुल घेऊन चारचाकी वाहनात बसलेला आहे.

त्यावरून पोलिसांनी तत्काळ पथकासह त्या ठिकाणी सापळा रचला. रात्री सुमारे ११.२५ वाजता एम एच -०९-एफ व्ही -९६७१ क्रमांकाची गाडी धाब्याजवळ उभी असल्याचे दिसून आले. संशय आल्याने पोलिसांनी छापा टाकला असता गाडीत पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला इसम बसलेला आढळला. चौकशीत त्याने आपले नाव अजय आबाजी सिद (वय २६, रा. पारगाव, ता. हातकणगले, ) असे सांगितले.

तपासादरम्यान वाहनाच्या चालकाच्या सीटखाली एक गावठी बनावटीचे पिस्तुल मिळून आले. पिस्तुल बाळगण्याचा परवाना विचारला असता आरोपीने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. परिणामी पोलिसांनी आरोपीकडून गावठी पिस्तुल व गाडी असा एकूण ₹१० लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

सदर प्रकरणी वडगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला २८ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्याला २९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

या कारवाईचे मार्गदर्शन योगेशकुमार गुप्ता (पोलीस अधीक्षक, कोल्हापूर), आण्णासाहेब जाधव (अपर पोलीस अधीक्षक,), तसेच अमोल ठाकुर (उपविभागीय पोलीस अधिकारी, जयसिंगपूर विभाग) यांनी केले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील, सहाय्यक फौजदार आबासो गुंडणके, सहाय्यक फौजदार साळुंखे, पोलीस अंमलदारआष्टेकर, पोलीस अंमलदार गायकवाड, आणि पोलीस अंमलदार मेनकर यांच्या पथकाने केली.

 सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आबासो गुंडणके यांच्याकडे सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.