जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने राष्ट्रीय एकता दौड उत्साहात संपन्न.
जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने राष्ट्रीय एकता दौड उत्साहात संपन्न.
जयसिंगपूर : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या वतीने राष्ट्रीय एकता दौड उत्साहात संपन्न झाली. जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखाली श्री सिद्धेश्वर मंदिर येथून दौडीला प्रारंभ झाला.
ही दौड रेल्वे स्टेशन रोड - क्रांती चौक - शिरोळ वाडी रोड मार्गे दसरा चौक स्टेडियम येथे समारोपास आली. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ आणि ‘हम सब एक है’ या घोषणांनी दौड मार्ग दुमदुमून गेला.
दौडच्या सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी केले. याप्रसंगी ते म्हणाले, “राष्ट्रीय एकता दौड ही देशातील ऐक्य, भाईचारा व राष्ट्रप्रेम दृढ करणारी परंपरा आहे. सर्व नागरिकांनी एकजुटीने राहणे हीच खरी देशभक्ती आहे.यावेळी शिरोळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर व रमेश यळगुडकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी केले. आभार पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी व्यक्त केले.
या उपक्रमात जयसिंगपूर कॉलेजचे कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभाग (NSS), लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल एन.सी.सी युनिट., रोटरी क्लब जयसिंगपूर, जयसिंगपूर पोलीस ठाणे चे अधिकारी व अंमलदार, होमगार्ड पथक, आर.बी.स्पोर्ट्स अकॅडमी, एन.सी.सी. ऑफिसर एस.एम.भोसले, डॉ.अतिक पटेल, चंद्रकांत(बापू)जाधव, राजेंद्र दाईगंडे, दादासो पाटील-चिंचवडकर, सचिन काडापूरे, मिलिंद भिडे व सचिन ताडे, संतोष खामकर व अन्य नागरिक उपस्थित होते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
No comments: