Header Ads

बेकायदेशीर काडतुसे बाळगणाऱ्या इसमास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई! 20,000 रुपयांची 20 जीवंत राऊंड जप्त — आरोपीला अटक.

 बेकायदेशीर काडतुसे बाळगणाऱ्या इसमास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई! 20,000 रुपयांची 20 जीवंत राऊंड जप्त — आरोपीला अटक.

--------------------------

संस्कार कुंभार .

--------------------------

कोल्हापूर :

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. योगेश कुमार गुप्ता (सो.) यांच्या आदेशानुसार अवैध अग्निशस्त्र व काडतुसे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज आणखी एक यशस्वी कारवाई केली आहे.


स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ऋषीराज विजय पाटील (वय 36, रा. सडोली खालसा, ता. करवीर) या इसमास हॉटेल गोकुळ, हळदी (ता. करवीर) परिसरात सापळा रचून अटक केली. त्याच्या ताब्यातून 20,000 रुपयांच्या किंमतीचे 20 जीवंत राऊंड जप्त करण्यात आले आहेत.


ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यांच्या पथकात अंमलदार दिपक घोरपडे, प्रविण पाटील, सत्यजित तानुगडे, अतिष म्हेत्रे, सुरेश पाटील, सतिश सुर्यवंशी, राजेंद्र ताटे, सुशिल पाटील आणि सागर चौगले यांनी सहभाग घेतला.


सदर प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


ही यशस्वी कारवाई करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुन्हा एकदा आपले शौर्य व दक्षता सिद्ध केली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस संपूर्ण जिल्ह्यातून “हिरो ऑफ द डे” म्हणत कौतुकाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Powered by Blogger.