Header Ads

गवा रेड्याच्या हल्ल्यात युवक जखमी काळजवाडे येथील घटना

  गवा रेड्याच्या हल्ल्यात  युवक  जखमी काळजवाडे येथील घटना 

--------------------------------

सुदर्शन पाटील बाजारभोगाव .

-------------------------------

 भात कापणी साठी आजोळातून ताडपत्री आणण्यासाठी गेलेल्या काळजवडे (ता पन्हाळा) येथील अजिंक्य दादू पाटील या तेवीस वर्षीय युवकावर गव्यांने हल्ला गेल्याने जखमी झाला.ही घटना आज गुरूवारी सकाळी सातच्या सुमारास घडली 

    परिसरात  भात कापणी मळणी हंगाम सुरू आहे.  काळजवडे येथील अजिंक्य पाटील याना भात मळणीसाठी लागणारी ताडपत्री आणण्यासाठी  गावातून आजोळी  सावतवाडीकडे निघाला गेला होता.  सुंबेवाडी - सावतवाडी असणाऱ्या रस्त्यावर जंगलातील गवा आला होता यावेळी  गव्यांने  जोराने धडक दिल्यामुळे तो रस्त्यावर पडला असून त्याच्या डोक्याला मार लागला व कानातून रक्त आले. तेथे जवळ शेतावर सुरू असलेल्या ऊस तोडप्यांच्या घटना लक्षात आली. त्यानी नातेवाईकांनी तात्काळ कळवले. यावेळी घटनास्थळी तात्काळ दाखल झालेले वनमजूर भुजिंगा पाटील यानी जखमी अजिंक्यला बाजारभोगाव  प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.  पुढील उपचारासाठी  छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  बाजारभोगाव वन परिमंडळ अधिकारी आर. एस. रसाळ सीपीआर मध्ये जावून जखमीची विचापूस केली.

  दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रदीप नरके यानी सीपीआर मध्ये जावून जखमी अजिंक्यची भेट घेतली. गंभीर जखमी असल्यास अजिंक्यला जनरल वार्डमध्ये उपचार करण्यात येत होते  तर सायंकाळी पाचच्या सुमारास पालकमंत्री प्रकाश आबिटकर यानी गव्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी असलेल्या अजिंक्यला अतिदक्षता विभागात हलवण्यात सांगितले व योग्य उपचार करावे अशा सूचना केल्या. 

कोट १

पावसाळा संपला अन् गवे शिवारात 

नुकताच पावसाळा संपला असून दरवर्षीप्रमाणे  गवे  शिवारात येण्यास सुरवात झाली आहे. कारण जंगलात गव्यांना मुबलक चारा मिळत नसल्यामुळे गवे शिवारातील पिके फस्त करतात. त्यामुळे  वनविभागाने नुसते कागदी घोडे नाचवून गव्यांचा बंदोबस्त करण्याची वल्गना न करता  तातडीने गवे शिवारात येणार नाहीत याची  दक्षता घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

फोटोओळ - जखमी अजिंक्य पाटील

No comments:

Powered by Blogger.