हातकणंगले पोलिसांची यशस्वी कारवाई; चोरीतील आरोपीस अटक — तब्बल ₹६ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत.
हातकणंगले पोलिसांची यशस्वी कारवाई; चोरीतील आरोपीस अटक — तब्बल ₹६ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत.
-------------------------------
शशिकांत कुंभार
--------------------------------
हातकणंगले : हातकणंगले पोलिसांनी केलेल्या प्रभावी कारवाईत ट्रक टायर चोरीप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, ६,७१,०२२ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सरस्वती वजन काटा, रुई फाटा (ता. हातकणंगले) परिसरात झालेल्या या चोरीप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
फिर्यादींच्या तक्रारीनुसार, एका लॉजिस्टिक कंपनीच्या आयशर टेम्पो क्रमांक एम एच -०९-एच जी ७४०७ मधील एकूण ३९ नवीन टायर्स किंमत ६ लाख ७१ हजार हे आरोपींकडून अप्रमाणिकरीत्या काढून गायब करण्यात आले होते.
या प्रकरणी हातकणंगले पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, दोन संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईत पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव, पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार, विनोद पिलाणे तसेच अंमलदार पथकातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी (पीसी) दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार करीत आहेत.

No comments: