विठ्ठल पंथी सांप्रदायिक भजनी मंडळामार्फत कार्तिकी एकादशीला नंदवाळ पायी दिंडी
विठ्ठल पंथी सांप्रदायिक भजनी मंडळामार्फत कार्तिकी एकादशीला नंदवाळ पायी दिंडी.
कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे
कोल्हापूर पैकी फुलेवाडी येथील विठ्ठल पंथी सांप्रदायिक भजनी मंडळामार्फत कार्तिक एकादशी निमित्य प्रति पंढरपूर असणाऱ्या नंदवाळ पायी दिंडी आयोजित केली होती
ही पायी दिंडी फुलेवाडी येथील टेबंलाई मंदिर पासून सुरुवात करण्यात आली यावेळी वारकरी सांप्रदायिक मंडळाचे वारकरी महिला विठ्ठलाचा गजर व भजन म्हणत पायी दिंडी बोंद्रेनगर नाना पाटील नगर मार्गे प्रति पंढरपूर असणाऱ्या नंदवाळ मार्गस्थ झाली त्यानंतर विठ्ठलपथी सांप्रदायिक मंडळाच्या वारकरी महिला पुरुषांनी विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेतले
या पायी दिंडीमध्ये विठ्ठल पंथी सांप्रदायिक भजनी मंडळ चे अध्यक्ष महादेव मेटे उपाध्यक्ष दत्तात्रेय पाडळकर सेक्रेटरी अरुण पाटील ऋषिकेश मिरजकर सदाशिव लाड आनंदा डंबे रंगराव पताडे इत्यादी मंडळाचे वारकरी महिला मोठ्या संख्येने पायी दिंडीमध्ये हजर होते

No comments: