मोहरे हायस्कूलच्या १९९५-९६ च्या बॅचचा स्नेहमेळावा आनंदात साजरा.
मोहरे हायस्कूलच्या १९९५-९६ च्या बॅचचा स्नेहमेळावा आनंदात साजरा.
बच्चे सावर्डे प्रतिनिधी - सुनिल पाटील
मोहरे (ता. पन्हाळा):
मोहरे हायस्कूल, मोहरे येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. सन १९९५-९६ या शैक्षणिक वर्षातील (शाळेच्या स्थापनेनंतरची चौथी बॅच) ७ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी जवळपास २० वर्षांनंतर एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमास प्राचार्या सौ. लतिका मोहिते, सेवानिवृत्त शिक्षक आर. एस. पाटील आणि व. जे. एन. पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
सकाळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. सुरुवातीला प्रत्येकाने स्वतःचा नव्याने परिचय करून दिला. यानंतर शाळेतील मस्ती, क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, शिक्षकांचा वचक आणि मिळालेली शिक्षा अशा आठवणींना उजाळा देण्यात आला. गप्पांच्या ओघात सर्वजण पुन्हा एकदा विद्यार्थी झाल्याचा अनुभव घेत होते.
अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून, “जीवनाच्या प्रवासात मिळवलेल्या यशामागे शाळेतील शिक्षणाची शिदोरी मोलाची ठरली,” अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमात गाणे, नृत्य, विनोदी गप्पा आणि स्नेहभोजनाचा आनंद घेण्यात आला. राजकारण, उद्योग, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक माजी विद्यार्थी विशेषतः बाहेरगावाहून या मेळाव्यासाठी उपस्थित राहिले होते.
या मेळाव्याच्या आयोजनासाठी रमेश पोतदार, सचिन रोकडे, दिलीप जगताप, विजय कुंभार, सारिका खवरे यांसह सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.
रिटश्री मोहिते यांनी स्वागत केले, प्रमोद डोंगर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर डॉ. तात्या झेंडे यांनी आभार मानले.

No comments: