लिंगनूर का. ग्रामपंचायत क्लार्कने पदाचा गैरवापर करत घरकुल योजनेतील एक लाख पंधरा हजार निधी केला हडप* कुंपणच शेत खातय, संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्षाची मागणी...
*लिंगनूर का. ग्रामपंचायत क्लार्कने पदाचा गैरवापर करत घरकुल योजनेतील एक लाख पंधरा हजार निधी केला हडप*
कुंपणच शेत खातय, संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्षाची मागणी...
मुरगूड/ जोतीराम कुंभार
कागल तालुक्यातील लिंगनूर कापशी मध्ये घरकुल योजनेत अपहर करून निधी उचलल्या बाबत मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद कोल्हापूर व बि.डि.ओ कागल यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
घरकुल योजनेमध्ये कुंपणच शेत खातय असा प्रत्यय लिंगनूर येथे आढळून आला आहे .सदरची तक्रार काॅम्रेड अशोक परशु मडके यांनी दाखल केलेली आहे.
लिंगनूर ग्रामपंचायत येथील कर्मचारी धनाजी जाधव यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पत्नीच्या नावे जुन्या बांधलेल्या घरावरच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घेतला सदर लाभार्थी चा रजिस्ट्रेशन आयडी mh 12955373 प्रशासकीय मान्यता दिनांक 29 /01 /25 आहे .मात्र वैशाली धनाजी जाधव यांचे हे घर चार वर्षांपूर्वीच बांधले गेले आहे.तसेच ते आरसीसी बांधकाम राहण्या योग्य स्थितीत आहे .तक्रारदारांनी संबंधित तक्रार दाखल करत असताना गुगल अर्थ चा पुरावा देखील जोडलेला आहे. सदर लाभार्थ्यांनी नवीन घर असल्याचे दाखवून एकूण तब्बल एक लाख पंधरा हजार रुपये चा सरकारी निधीचा अपहार केला आहे. तसेच पदाचा गैरवापर करत योजनेचा लाभ उठवला आहे . तक्रारदार काॅम्रेड अशोक परसु मडके यांनी आपली मत मांडताना सांगितले आहे की, संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करून अपहार झालेला निधी वसूल करून संबंधित व्यक्तीस ग्रामपंचायत कार्यालयातून निलंबित करण्याची मागणी केलेली आहे .यामुळे लिंगनूर पंचक्रोशी मध्ये घरकुल योजनेचा व घरकुलांच्या बाबत घडलेल्या घटनेची प्रचंड चर्चा चालू आहे. खऱ्या लाभार्थीला बाजूला ठेवून लाभ उठवणाऱ्या अशा प्रवृत्तीस धडा शिकवण्याची मागणी देखील होत आहे.अशी मागणी करताना काॅम्रेड नामदेव भोसले, काॅम्रेड अशोक परसु मडके, काॅम्रेड तुषार किल्लेदार उपस्थित होते.

No comments: