एकोंडी परिसरात बेकायदेशीर सावकारकी फोफावली; शेतकऱ्यांची पिळवणूक वाढली.
एकोंडी परिसरात बेकायदेशीर सावकारकी फोफावली; शेतकऱ्यांची पिळवणूक वाढली.
प्रतिनिधी – सचिनराव मोहिते, कागल
कागल तालुक्यातील एकोंडी परिसरात खाजगी सावकारकीचा बेकायदेशीर व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावत असल्याचे समोर आले आहे. या भागातील खोंद्रे नावाचा इसम कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना सावकारकी व्यवसाय करीत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या सावकाराकडून महिना दहा टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येते, मात्र बदल्यात कोरे स्टॅम्प पेपरवर सह्या, कोरे धनादेश घेणे, तसेच व्याजावर व्याज आकारून कर्जदारांना मानसिक छळ देण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी व्याजाच्या जाचाला कंटाळून शेतजमीन विकावी लागल्याची, तर एकाने घरदार सोडून जाण्याची चर्चा गावात आहे. प्रशासनाकडून या बेकायदेशीर सावकारकीवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “प्रशासनाने तत्काळ चौकशी करून या सावकारावर कठोर कारवाई करावी, अन्यथा कोणताही मोठा अनर्थ होऊ शकतो.”
👉 स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन अशा बेकायदेशीर सावकारकीला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

No comments: