डॉ.मगदूम अभियांत्रिकीला अंतरविभागीय विद्यापीठ अथलेटिक्स मध्ये सुवर्ण
डॉ.मगदूम अभियांत्रिकीला अंतरविभागीय विद्यापीठ अथलेटिक्स मध्ये सुवर्ण.
जयसिंगपूर/प्रतिनिधी
जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या कु. ओंकार किल्लेदार यांनें विद्यापीठाच्याअंतरविभागीय अथलेटिक्समध्ये 'भालाफेक'या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकाविले तसेच वेटलिफ्टिंग क्रीडाप्रकारामध्ये ६० किलो वजन गटामध्ये कु.विनीत चोपडेनें द्वितीय व कु. अभिषेक भोसले यानें ७० किलो वजन गटात तृतीय क्रमांक मिळवून महाविद्यालयास क्रीडा क्षेत्रात यश संपादन करून दिले आहे.
विद्यापीठ स्तरिय स्पर्धेत खेळण्यासाठी या विद्यार्थ्यांना संधी मिळण्यास वाव आहे असे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. नवनाथ पुजारी यांनी सांगितले.
संस्थेचे चेअरमन डॉ.विजय मगदूम, व्हा.चेअरपर्सन ॲड. डॉ. सोनाली मगदूम, कार्यकारी संचालक डॉ. एस. एस. आडमुठे व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. बी.पाटील यांनी यश संपादित विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विदयार्थ्यांना डीन-स्टुडंट वेल्फेअर प्रा. पी. पी. पाटील यांचे सहकार्य व शारीरिक शिक्षण संचालक एन. के.पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments: