Header Ads

खडतर जीवनातील उभरता दिग्दर्शक रप्पाटा या मराठी चित्रपटाने गाठली यशाची शिखरे : निर्माता दिग्दर्शक सागर सूर्यवंशी.

 खडतर जीवनातील उभरता दिग्दर्शक रप्पाटा या मराठी चित्रपटाने गाठली यशाची शिखरे : निर्माता दिग्दर्शक सागर सूर्यवंशी.

------------------------------------------

 कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

संजय  कुंभार

------------------------------------------

मराठी चित्रपटसृष्टी सध्या कोणत्या वळणावर आहे, असा प्रश्न विचारणान्यांच्या थोबाडात एक सणसणीत 'रप्पाटा' बसला आहे! होय, मी बोलतोय ते सध्या काल्हापूरच्या लाल मातीत धुरळा उडवणाऱ्या आणि अवघ्या महाराष्ट्राच्या काळजाचा ठाव घालणाऱ्या रप्पाटा' या चित्रपटाबद्ल. कोणत्याही बड्या बापाचा वरदहस्त नाही. जाहिरातींचा अवाढव्य बाजार नाही की को्टीच्या प्रसिद्धीचा झगमगाट नाही; तरीही या चित्रपटाने जे यश खेचून आणले आहे, ते पाहून आमची छाती अभिमानाने भरून आली आहे

आजकालचे चित्रपट म्हणजे केवळ मार्केटिंगचा खेळ झाला आहे. पण 'रप्पाटा'च्या निर्मात्यांनी, दिग्दर्शकांर्न आणि लेखकांनी सिद्ध केले की, जर तूमच्या मनगटात ताकद असेल आणे पडद्यावर मांडलेल्या कथेत प्रामाणिकपणा असेल, तर प्रेक्षक स्वतःहून खेचला जातो. कोणतीही मोठी जाहिरात नसताना केवळ प्रेक्षकांच्या शब्दाखातर कोल्हापूरच्या चित्रपटगहांबाहेर लागलेल्या रांगा, हे या टीमच्या तपश्चर्येचे फळ आहे. मराठी सिनेसष्टीला मरगळ आली असताना या चित्रपटाने दिलेली 'नवी संजीवनी मोलाची आहे

विषय काय? तर शिक्षण शिक्षणासारख्या गंभीर विषयावर चित्रपट बनवून प्रेक्षकांना रडवणं, हे काही येड्यागबाळ्याचे काम नाही. चित्रपट संपवून बाहेर येणारा प्रेक्षक जेव्हा ओल्या डोळ्यांनी आणि जड अंतःकरणाने बाहेर पडतो. तेव्हा समजावे की लेखकाच्या लेखणीने आणि दिग्दर्शकाच्या दृष्टीने थेट काळजाला भोक पाडले आहे. 

चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक प्रेमसागर गौतम सूर्यवंशी यांनी मराठी चित्रपटामध्ये लेखक आणि दिग्दर्शक म्हणून पाऊल टाकण्याचं पहिल स्वप्न पाहिलं ते 2009 मध्ये. चित्रपट तर खुप बनतात पण आपल्याला काहीतरी नवीन आणि वास्तविकता दर्शवायची आहे या विषयाची जिज्ञासा मनी घेऊन हा प्रवास चालू केला..गेली 10 वर्ष या विषयावर अभ्यास केला.व लेखन केले.घरची परिस्थिती बेताची असताना एका सामान्य कुटुंबातील मुलगा स्वतःच्या जीवावर एवढ्या मोठया मराठी चित्रपट सृष्टीत आपलं स्थान मिळवण्यासाठी सज्ज झाला.तो पर्यंत अचानक वडिलांचे निधन झाले.त्याच्या वर असलेला मायेचा हात आणि वडिलांची प्रेमळ थाप कायमस्वरूपी त्याला पोरक करून गेली. घरचा मोठा मुलगा असल्यामुळे घरची पूर्ण जबाबदारी एकटयावर येऊन ढासळली... आणि इथून सुरु झाला खडतर प्रवास. चित्रपटसृष्टीतील स्वप्न बाजूला ठेवून घरची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन आयुष्य पुढे ढकलत असताना. मनात कुठे तरी खंत होती आपण लिहलेल्या चित्रपटाची..वडिलांच दुःख विसरून नव्याने सुरवात केली पण सर्वात मोठी अडचण होती ती आर्थिक. आर्थिक आणि मानसिक परिस्थिती मध्ये गुरफाटलेला मुलगा काहीच करू शकणार नाही. या मुळे त्याची सर्वानी साथ सोडली. अपेक्षा सोडल्या, एकटा जीव भटकत राहिला. कठोर परिश्रम घेऊन आर्थिक, मानसिक, परिस्थितीचा सामना एखादया पाषाणा सारखा करत उभा राहिला,आणि मराठी तील कधीही न पाहिलेला आणि कुणीही न मांडलेला विषय म्हणजे" रप्पाटा" हा चित्रपट पूर्ण महाराष्ट्र भर मोठया पडद्यावर आणला. म्हणतात ना यश हे असच मिळत नसत. त्याला खेचून आणायचं असत. याच उत्तम उदाहरण म्हणजे प्रेम सागर गौतम सूर्यवंशी..

No comments:

Powered by Blogger.