योगीराज श्री गगनगिरी महाराजांचे पुण्यतिथी उत्सवाचे मर्द किल्ले गगनगडावर भव्य आयोजन!
योगीराज श्री गगनगिरी महाराजांचे पुण्यतिथी उत्सवाचे मर्द किल्ले गगनगडावर भव्य आयोजन!
------------------------------
सुनिल मोळे
-----------------------------
कळे:- प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गगनबावडा तालुक्यातील स्वामी श्री गगनगिरी महाराजांचे गगनगडावरील गगनगिरी आश्रमांत महाराजांचा १८ वा पुण्यतिथी उत्सवास दिनांक १४
जानेवारी पासून प्रारंभ होणार असून दिनांक १६ जानेवारीला याची सांगता होणार आहे.
या निमित्ताने आश्रम स्थानी विविध धार्मिक,सामाजिक,सांस्कृतिक तसेच आरोग्य विषयक कार्यक्रमांचे भव्य प्रमाणावर आयोजन करण्यात आले आहे.
या पुण्यतिथीउत्सवाचे निमित्ताने श्रीक्षेत्र ओणीआश्रम चे वतीने श्रीक्षेत्र गगनगडावर गुरूवार दि.१५ रोजी मोफत आरोग्य शिबीराचे भव्य आयोजन करण्यात आलेअसून ते सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहणार आहे.
या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजेच गुरूवार दिनांक १५ रोजी पहाटे महाराजांच्या मूर्तीस मंगल स्नान तसेच पादुकांवर अभिषेक पूजन करण्यात येणार असून नंतर काकड आरती व इतर धार्मिक विधी यथासांग संपन्न झाल्यावर श्री.गुरूसप्तशती चे सामुदायिक पारायण संपन्न होईल.
यावेळी परिसरातील भाविक महिला मंडळी आपल्या गगनगिरी देवासाठी आपापल्या घरून आपल्या सवडीनुसार गोड वा तिखट पदार्थ बनवून आणणार असून महाआरती वेळी प्रत्येक महिलांवर्गानी ताम्हण व निरंजन घेवून येणे आहे, बाकीचे साहित्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सदर उत्सवाच्या निमित्ताने आश्रम स्थानी परिसरातील विविध भजनी मंडळाची भजने आयोजित करण्यात आली असून महाआरती व पालखी प्रदक्षिणाचे तसेच पावणाई देवी समई नृत्य मंडळ किंजवडे(देवगड) यांचे वतीने समई नृत्याचे कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यांत आले आहे
तरी जास्तीत-जास्त भाविकांनी महाराजांचे या प्रखर तपोस्थानी येवून येथील धार्मिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेवून स्वामी गगनगिरी महाराजांचे दिव्यस्थानाचे दर्शन-आशिर्वादाचा लाभ घेऊन सहकार्य करावे,असे आवाहन मर्द किल्ले गगनगडाचे सन्माननीय विश्वस्त-व्यवस्थापक बापूसाहेब पाटणकर,रमेशराव माने,संजयसिंह पाटणकर यांनी केले आहे, असे स्वामी गगनगिरी सेवेकरी सुरेंद्र देशमुख कळवितात.

No comments: