Header Ads

यवलूज (ता. पन्हाळा )इथल्या मजूराच्या मुलग्याने भारतीय तटरक्षक दलाच्या वतीनं घेण्यात आलेल्या परीक्षेत मिळविले घवघवीत यश.गावातून मिरवणूक काढून गावकर्‍यांनी केला जल्लोश.

 यवलूज (ता. पन्हाळा )इथल्या मजूराच्या मुलग्याने भारतीय तटरक्षक दलाच्या वतीनं घेण्यात आलेल्या परीक्षेत मिळविले घवघवीत यश.गावातून मिरवणूक काढून गावकर्‍यांनी केला जल्लोश.

--------------------------------

पन्हाळा प्रतिनिधी

आशिष पाटील

--------------------------------

निश्चित ध्येयापर्यंत पोहचून यशाला गवसणी घालायची असेल तर वाटेतील अपयशाची चव चाखायची तयारी ठेवावीच लागेल हि मानसिकता ठेऊन आपल्या लक्षापासून विचलीत न होता.वाटचाल करत राहिल्यास यश निश्चित मिळते.त्यासाठी मनात जिद्द,चिकाटी,मेहनत याला पर्याय नसल्याचे पन्हाळा तालुक्यातील यवलूज इथल्या लहू विठ्ठल पाटील याने सांगितले.भारतीय तटरक्षक दलाच्या वतीनं घेण्यात आलेल्या परीक्षेत त्याने यश मिळविले असून असिस्टंट कमांडंट वर्ग एकसाठी त्याची निवड झालीयं.गवंड्याच्या हाताखाली मजूरी करणार्‍याच्या पोरग्यांने यश मिळवलेले पाहून सारा गाव आनंदलायं.लहूच्या यशाचे कौतुक करण्यासाठी गावकर्‍यांनी गावातून भव्य मिरवणूक काढून जल्लोश केला.


व्हीओ :मनात जिद्द ,चिकाटी व कष्ट करायची तयारी असल्यास अकाश देखील ठेंगणे होते.यशाच्या वाटेवर चालत असताना अपयशाची देखील चव चाखावी लागते.अपयशाने खचून माघारी न फिरता प्रयत्न करीत राहिल्यास यश निश्चित प्राप्त होते.हे दाखवून दिलयं पन्हाळा तालुक्यातील यवलूज इथल्या लहू विठ्ठल पाटील या तरूणाने.घरची अत्यंत हलाकीची परस्थिती,रहाण्यासाठी भिंत कोसळलेले घर,पावसाळ्यात कधी घर पडेल याचा नेम नाही,अशी घरची अत्यंत हलाकीची परस्थिती,आई वडील अशिक्षित वडीलांनी गवंड्याच्या हाताखाली मजूरी करून दोन्ही मुलांना शिकवले.वडीलांच्या कष्टाची चिज करीत लहू याने अत्यंत कठीन समजली जाणारी भारतीय तटरक्षक दलातील असिस्टंट कमांडंट या पदासाठीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालायं.

वेळोवेळी स्पर्धा परीक्षा दिल्या.अनेकवेळा त्यामध्ये त्याला अपयश देखील आले.पण अपयशाने खचून न जाता यश मिळवलयं.

      लहू याला लेफ्टनंट होण्याची लहान पणापासूनच इच्छा गप्प बसू देत नसल्याने त्यांनी घरची अर्थिक परस्थिती आड येत असल्याने गावातच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले तर उच्चशिक्षण कोल्हापूर इथल्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये घेतले.लहूची शिक्षणातील तळमळ आणी चिकाटी पाहून त्यांची पुणे इथं रहाणारी आत्या शारदा अशोक तिबीले यांनी लहू याला पुणे इथं खासगी शिकवणी लाऊन परीक्षेची तयारी करून घेतली.होतकरू लहूला तिबीले कुटूंबाने गरजेचे वेळी शैक्षणिक पाठबळ देऊन तयारी करून घेतल्यानेच हे यश पदरात पडल्याचे आई इंदूबाई पाटील यांनी 

 गरीब कुटूंबातील विठ्ठल तात्याचा पोरगा साहेब झाल्याचे समजताच यवलूज ग्रामस्थांचा ऊर अभिमानाने भरून आलायं.गावचा सुपूत्र अधिकारी झाल्याचे समजताच यवलूज ग्रामस्थांनी व त्याच्या मित्रांनी लहूच्या मिरवणूकी जय्यत तयारी केली होती.लहूची जल्लोशात गावातून वाद्याच्या गजरात मिरवणूक काढली.गावकर्‍यांनी व मित्रांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोश केला.जागोजागी अभिनंदनाचे फलक लावून अभिनदन करण्यात आले होते.दरम्यान महिलांनी पारंपारीक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले.लहान थोर मंडळीसह अबुलवृद्धांनी मिरवणूकीत सहभाग घेतला होता.

No comments:

Powered by Blogger.