Header Ads

जयसिंगपूर नगरपरिषद निवडणुकीत यड्रावकर गटाची बाजीनगराध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर; 26 पैकी 20 जागा राजश्री शाहू विकास आघाडीची ताब्यात.

 जयसिंगपूर नगरपरिषद निवडणुकीत यड्रावकर गटाची बाजीनगराध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर; 26 पैकी 20 जागा राजश्री शाहू विकास आघाडीची ताब्यात.

-------------------------------------

जयसिंगपूर प्रतिनिधी

नामदेव भोसले

-------------------------------------

जयसिंगपूर नगरपरिषद निवडणुकीत राजश्री शाहू विकास आघाडीने प्रचंड विजय मिळवत नगराध्यक्षपदासह 26 पैकी तब्बल 20 जागांवर विजय मिळवला. या आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांनी 11,179 मतांच्या फरकाने विजय मिळवला.शहरातील निवडणूक प्रारंभी एकतर्फी वाटत असली तरी अखेरीस चुरशीच्या झाली. संजय पाटील यड्रावकर यांनी विरोधी शिरोळ तालुका विकास आघाडीचे सुदर्शन सदाशिव कदम यांचा पराभव केला. एकूण 35,102 मतदारांपैकी यड्रावकर यांना 22,647 मते, तर कदम यांना 11,460 मते मिळाली.या विजयाने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वावरील विश्वास अधिक वृद्धिंगत झाला. प्रचार मोहिमेत संजय पाटील यड्रावकर यांच्यासोबत सावकर मादनाईक, मिलिंद भिडे, शितल गटारे आदींनी सक्रिय भूमिका बजावली. दुसरीकडे विरोधी आघाडीकडून काँग्रेस नेते बंटी पाटील, गणपतराव पाटील, माधवराव घाडगे आदींच्या प्रचार मोहिमेमुळे संघर्ष रंगात आला.मतमोजणी सिद्धेश्वर मंदिर यात्री निवास येथे दुपारी साडेबारा ते एका दरम्यान पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा चव्हाण यांनी अधिकृत निकाल जाहीर करत संजय पाटील यड्रावकर यांच्या विजयाची घोषणा केली.विजयी नगरसेवकांचे प्रभागनिहाय तपशीलप्रभाग १: ‘अ’ कोळी गिरमल परगोंडा, ‘ब’ तेजश्री राहुल पाटील (यड्रावकर)

प्रभाग २: ‘अ’ बंडगर रुपाली राहुल, ‘ब’ चौगुले सचिन महावीर

प्रभाग ३: ‘अ’ नांद्रेकर मीनल रोहित, ‘ब’ सचिन आप्पासाहेब निटवे

प्रभाग ४: ‘अ’ मछले शकुंतला कांतीलाल, ‘ब’ गोसावी लक्ष्मण शंकर

प्रभाग ५: ‘अ’ कडबी सुमैय्या सुलेमान, ‘ब’ खामकर बजरंग मनोहर

प्रभाग ६: ‘अ’ कलकुटकी महेश प्रदीप, ‘ब’ मादनाईक स्वाती सागर

प्रभाग ७: ‘अ’ कोळेकर अनिता अशोक, ‘ब’ जाधव संतोष बाबूराव

प्रभाग ८: ‘अ’ वाघवेकर उज्वला उत्तम, ‘ब’ पाटील पराग शामराव

प्रभाग ९: ‘अ’ मळगे अशोक मनोहर, ‘ब’ फरास कुलसुम फिरोज

प्रभाग १०: ‘अ’ अर्जुन उर्फ राजीव तानाजी देशमुख, ‘ब’ आडके अनुराधा राजेंद्र

प्रभाग ११: ‘अ’ भोसले गीता संजय, ‘ब’ पवार रंगराव हिंदुराव

प्रभाग १२: ‘अ’ आडगाणे अर्चना विद्यासागर, ‘ब’ संजयकुमार वसंत पाटील (कोथळीकर)

प्रभाग १३: ‘अ’ गाडेकर लता दिलीप, ‘ब’ गुरव पंकज भरमाप्पामतमोजणीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्वतः भेट देऊन पाहणी केली.निकाल जाहीर होताच शहरभर 'आम्ही यड्रावकर!' असा जल्लोष सुरू झाला. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांच्या नादात विजयाचा जल्लोष साजरा केला.

No comments:

Powered by Blogger.