वडगावात यादव आघाडीला 15 तर जनसुराज्य-ताराराणीला 5 जागा.
वडगावात यादव आघाडीला 15 तर जनसुराज्य-ताराराणीला 5 जागा.
पेठ वडगाव : वडगाव नगरपरिषद निवडणुकीमध्ये यादव आघाडी पॅनलने घवघवीत यश मिळवत सत्ता स्थापन केली .
लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी यादव आघाडीकडून विद्याताई पोळ यांनी तब्बल 2263 मतांनी विजय मिळविला. नगरसेवक पदाच्या 20 जागांपैकी यादव आघाडी पॅनलने 15 जागा जिंकुण स्पष्ट बहुमत मिळवले, तर जनसुराज्य–ताराराणी आघाडीला 5 जागांवरच समाधान मानावे लागले.
येथील मराठा समाज भवन मध्ये सकाळी सुरवातीपासून मतमोजणीला संथ गतीने सुरुवात झाली.
निकाल जाहीर होताच वडगाव शहरात मोट्या प्रमाणात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. समर्थकांनी गुलालाची उधळण करत, फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत विजयोत्सव साजरा केला.
नगराध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये यादव पॅनेल आघाडीच्या विद्याताई पोळ यांना (10827) मते मिळाली तर
जनसुराज्य-ताराराणी आघाडीच्या उमेदवार प्रविता सालपे यांना (8662) मते मिळाली असून त्यांचा 2263 मतांनी पराभव झाला.
यादव आघाडीचे नगरसेवक पदाचे विजयी उमेदवार उमेदवार पुढील प्रमाणे -
प्रभाग 1) सुरेखा महादेव अनुसे(1057),
प्रभाग क्रमांक 2)
धनश्री इंद्रजीत पोळ(1025),मिलिंद लमुवेल सनदी,( 896),
प्रभाग 3) निवास वसंत धनवडे,(1077),
प्रभाग 3)वर्षा सतीश पवार(1104),
प्रभाग 5),
विशाल विजय वडगावे(1021),
रूपाली अभिजीत माने(1145),
प्रभाग 6)
कल्पना सर्जेराव भोसले(1169),
अभिजीत बाळासो गायकवाड,(1137),
प्रभाग 7)
प्रवीण आप्पासो पाटील(1139),
सुषमा बाबासो पाटील,(1222),
प्रभाग 8) नीला जयसिंग जाधव,(1367)
जवाहर बाजीराव सलगर,(1579),
प्रभाग 9) सुमन अशोक कोळी(1156),
गुरुप्रसाद दिलीपसिंह यादव(1007) इतक्या मतांनी विजयी झाले.
तर जनसुराज्य शक्ती पक्ष,ताराराणी आघाडी व युवक क्रांती आघाडी गटाचे विजयी उमेदवार,
प्रभाग 1 )संतोष बबनराव चव्हाण(1027),
प्रभाग 3)अंजली संग्रामसिंह थोरात(1150),
प्रभाग 4)मोहनलाल रामलाल माळी (1154),
प्रभाग.10)
राजश्री बाबासाहेब भोपळे,(1061)
अजय श्रीकांत थोरात (1057), हे विजयी झाले.

No comments: