संस्कार : मराठी शाळेचे जतन करणे गरजेचे आहे.
संस्कार : मराठी शाळेचे जतन करणे गरजेचे आहे.
--------------------------गगनबावडा प्रतिनिधी
सुनिल मोळे.
-------------------------
गगनबावडा:- आज वि.मं. कोनोली ते पाटीलवाडी दरम्यान एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. रस्त्यावरून चालत जाणाऱ्या एका वृद्ध आजीच्या डोक्यावर गाठोडे होते. वयामुळे तिच्या पावलांना स्थिरता नव्हती, ती लटपटत चालत होती.
हि अवस्था पाहून वि.मं. कोनोलीच्या विद्यार्थिनी — कु. श्रध्दा, दिव्या आणि श्रृतिका — तात्काळ पुढे सरसावल्या. त्यांनी आजीची विचारपूस केली, तिचे गाठोडे स्वतःच्या खांद्यावर घेतले, तिला पाणी दिले आणि संबंधित नातेवाईकांच्या घरी सुरक्षित पोहोचवले.
हा प्रसंग केवळ मदतीचा नाही, तर मराठी शाळेतील संस्कारांचा जिवंत पुरावा आहे.
आजच्या इंग्रजी माध्यमाच्या मुलांनी कदाचित ही अवस्था पाहून दुर्लक्ष केले असते, पण मराठी शाळेतील विद्यार्थिनींनी मानवी मूल्ये जपली.
मराठी शाळा केवळ शिक्षण देत नाहीत, तर संस्कार, सहानुभूती आणि सामाजिक जबाबदारी शिकवतात.
मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे मुलांमध्ये मानवी मूल्ये, परंपरा आणि संस्कृती रुजतात.
अशा घटना समाजाला आठवण करून देतात की, मराठी शाळा वाचवणे म्हणजे संस्कार वाचवणे.
पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत दाखल करून संस्कारांची परंपरा जपावी.
शासनाने मराठी शाळांना आवश्यक पाठबळ द्यावे.
समाजातील प्रत्येकाने मराठी शाळेच्या अस्तित्वासाठी आवाज उठवावा.
आजच्या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की, मराठी शाळा वाचवणे म्हणजे समाजाचे भविष्य वाचवणे आहे.

No comments: