न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न.
--------------------------शाहुवाडी प्रतिनिधी : आनंदा तेलवणकर
----------------------------
शाहुवाडी :न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण शाळेचे शैक्षणिक वर्ष 2025- 26 चे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडले. त्यावेळी कार्यक्रमाचे उद्धघाटन प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रशासकीय अधिकारी मा.बी आर अकिवाटे यांच्या शुभ हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी करंजफेण ग्रामपंचायतीचे सरपंच सौ मनीषा पोवार व सर्व सदस्य. आजी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संजय पोवार ,उपाध्यक्ष भगवान पाटील, कोषाध्यक्ष प्रविण पाटील
शाळेचे मुख्याध्यापक एन.एन.काळोलीकर. पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी,सामजिक कार्यकर्ते मान्यवर म्हणून उपस्थित होते. त्यावेळी प्रथमता सर्व उपस्थितांचे स्वागतगीतांनी सहर्ष स्वागत करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे संस्थापक डी.सी.नरके यांच्यावर रचलेला पोवाडा सादर करण्यात आला. वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक एन.एन.काळोलीकर यांनी केले.व स्नेहसंमेलन कार्यक्रमाची रूपरेषा मांडली व शाळेच्या
शैक्षणिक वर्षभरात राबवलेल्या विविध उपक्रमाचा आढावा घेतला. त्यानंतर शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी कु.आदिती चंद्रकांत पाटील हिने वर्षभरातील झालेल्या घडामोडींचा वार्षिक अहवाल सादर केला. त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाल, श्रीफळ, बुके देऊन सहर्ष असे स्वागत करण्यात आले. वर्षभरातील झालेल्या स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची प्रशस्तीपत्र व मेडल देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. तसेच माजी विद्यार्थी संघटनेमार्फत आयोजित केलेल्या केटीएस स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय बी. आर. अकिवाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतातून यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व कला म्हणजे काय असते हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. त्यानंतर करंजफेण गावचे सामजिक कार्यकर्ते नामदेव पोवार व इतर प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते कुंडीतील वृक्षाला पाणी घालून सत्र दोन ची सुरुवात करण्यात आली.सर्व विद्यार्थ्यांनी या स्नेहसंम्मेलनामध्ये सहभागी होऊन आपल्या अंगी असणारे गुणप्रदर्शन उत्साहपूर्ण नृत्याने करून उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुणे, विविध शैक्षणिक, सामजिक, राजकीय क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांना, पालक वर्ग.ग्रामस्थ यांना मंत्रमुग्ध केले. आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट असे नृत्य विद्यार्थी करत होते. व उपस्थितांची वाहवा मिळवत होते. देशभक्ती गीत, पारंपरिक नृत्य-महाराष्ट्राची गाथा. छावा या गीतांनी सर्वांचं मन वेधून घेतलं. ग्रामीण जीवनाची
गाणी, लोकगीत,देवदेवतांचे गाण्यावर, कोळीगीत, संदेश पर नाटिका आपल्या कलेचे चित्रण करत होती. अतिशय देखणे, उत्कृष्ट असे स्नेहसंमेलन शाळेमध्ये संपन्न झाले. हा स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक. सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले. या स्नेहसंमेलनाच्या वेळी उपस्थित मान्यवर व प्रेक्षकांचे आभार एम.व्ही कांबळे यांनी मानले.

No comments: