Header Ads

गोलिवडेतील सुरज शिंदेच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन.

 गोलिवडेतील सुरज शिंदेच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन.

--------------------------------

पन्हाळा प्रतिनिधी

आशिष पाटील

--------------------------------

 गोलिवडे (ता.पन्हाळा) येथील अमर केशव शिंदे यांना दोन मुले, एक मुलगा कर्णबधीर तर दुसरा मुकबधीर आहे.सुरज शिंदे (वय २४)हा मुखबधिर असून त्याला जन्मताच ग्रोथ हारर्मोन Growth Hormone आजार असल्याने वजन अवघे १५ किलो आहे.सुरज याला निमोनिया झाला असून त्याच्या फुफुसाची शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे. त्याच्यावर कोल्हापूरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारासाठी समाजातील दानशूरांनी मदत करण्याची गरज आहे.

       अमर शिंदे हे भूमीहिन असून रोजंदारी करून दोन दिव्यांग मुलांचा सांभाळ करीत आहेत.तुटपुंज्या उत्पन्नातून संसार सावरताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत असताना अचानकपणे ओढवलेल्या संकाटामुळे शिंदे कुटूंब हवालदिल झाले आहे.सुरजच्या उपचारासाठी पाच लाखांचा खर्च सांगितला असून उपचारासाठी पैसे नसल्याने सुरजचा जीव वाचविण्यासाठी समाजातील दानशूरांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Powered by Blogger.