कळे पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी; गहाळ 9 मोबाईल हस्तगत, मालकांना परत
कळे पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी; गहाळ 9 मोबाईल हस्तगत, मालकांना परत.
------------------------------कळे प्रतिनिधी.
आशिष पाटील .
--------------------------
कळे पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गहाळ मोबाईल प्रकरणात पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीचे ९ मोबाईल फोन पोलीस कॉन्स्टेबल अंकुश शेलार यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेऊन यशस्वीरीत्या हस्तगत केले.
“रेझिंग डे” अनुषंगाने राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल संबंधित मालकांना बोलावून त्यांना परत देण्यात आले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कळे पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments: