प्रा. एन.डी. पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
प्रा. एन.डी. पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
थोर विचारवंत व सामाजिक चळवळीचे प्रणेते प्राध्यापक डॉक्टर एन. डी. पाटील यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय मलकापूर येथे प्रा. बाळकृष्ण जाधव, शांताबाई चंद्रप्पा शेंदुरे महाविद्यालय, हुपरी यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते. आपल्या मनोगतामध्ये त्यांनी एन. डी. पाटील यांचा जीवनपट मांडला. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा एन.डी पाटील यांनी पुढे चालवला. सामाजिक, शैक्षणिक महाराष्ट्र सीमा प्रश्न, तसेच विवेक वादाची पायाभरणी यांनी केली असे प्रतिपादन केले.
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते वाड:मय मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या भित्तिपत्रिकेची उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डॉ.बनसोडे एस. पी. या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीमती सूर्यवंशी एम. बी. यांनी केले प्रा. श्रीमती लवेकर एस एस. यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पोरे एस. बी. शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते

No comments: